27 December 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC
x

Child on Social Media | पालकांनो 77% मुलं बनावट जन्मतारखेसह सोशल मीडियावर बनवतात अकाउंट, धक्कादायक माहिती उघड

Child on social media

Child on Social Media | ब्रिटनमधील मीडिया वॉचडॉग ऑफकॉमने मंगळवारी असे स्पष्ट केले आहे की, 8 ते 17 वयोगटामधील एक तृतीयांशपेक्षा जास्त लहान मुलांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट जन्मतारखेसह साइन अप केले आहे. ऑफकॉमने एका निवेदनात म्हटले की, आमचे नवीनतम संशोधन असे दर्शविते आहे की, 8 ते 17 वर्षे वयोगटामधील बहुतेक मुले सोशल मीडिया वापरकर्ते म्हणजेच सुमारे 77 टक्के लोकांचे स्वतःचे खाते किंवा प्रोफाइल, एका मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे. तसेच न्यूज एजन्सी IANS यांच्या मते, जेव्हा हे वापरकर्ते ऑनलाइन नसतात, तेव्हाही त्यांचे मित्र आणि शाळेतील सहकाऱ्यांसोबतचे त्यांचे संवाद अनेकदा नवीनतम सोशल मीडिया किंवा ऑनलाइन गेमिंग ट्रेंडवर केंद्रित असतात.

अकाउंट काढण्यासाठी वय मर्यांदा
लहान मुले मोबाईल घेऊन काय करतील ते सांगता येणार नाही. खबर संशोधनाने असे दाखवले आहे की अनेक मुलांनी, विशेषत: लहान वयोगटातील मुलांनी त्यांच्यां पालकांना त्यांचे सोशल मीडिया खाते सेट करण्यात मदत करण्यास सांगितले होते. बहुतेक सोशल मीडिया अॅप्सवर खाते तयार करण्याचे किमान वय 13 वर्षे आहे. तसेच अनेक प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना त्यांचे खाते सेट करताना त्यांचे वय स्वतः घोषित करण्यास सांगितले जाते.

पुढे ऑफकॉमने सांगितले की, ज्या मुलांनी हे केले आहे त्यांच्यापैकी काहींनी आम्हाला सांगितले की त्यांनी प्रोफाइलमध्ये त्यांचे वय जास्त नमूद केले आहे, आणि मोठ्या वयात प्रोफाइल तयार करण्यासाठी त्यांनी दिलेल्या कारणांपैकी एक म्हणजे जेव्हा त्यांची प्रोफाइल मुलाच्या वयात नोंदणीकृत केली जाते, तेव्हा त्यांना अधिक मर्यादित अनुभव असतो. गेल्या महिन्यामध्ये, आयर्लंडच्या डेटा संरक्षण आयोगाने अशा बनावट खात्यांची चौकशी केल्यानंतर मेटाला 405 दशलक्ष युरोचा दंड ठोठावला आहे.

योग्य सामग्रीचा सामना करा
काही पालकांना वयोमर्यादेची जाणीव असते मात्र ते त्यांच्या 13 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी देतात आणि कदाचित त्यांना निर्णय घेण्यास सोयीस्कर वाटते, उदाहरणार्थ, त्यांच्या 10 वर्षांच्या मुलास 13 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी योग्य सामग्री येऊ शकते, असे देखील अहवालात म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Child on Social Media fact revels checks details 13 October 2022.

हॅशटॅग्स

Child on social media(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x