23 January 2025 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअरला अजून धक्का बसणार? स्टॉकच्या किंमतीवर काय परिणाम होईल? काय आहे कारण?

Zomato Share Price

Zomato Share Price | शेअर बाजारात आज म्हणजेच बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी बरीच उलाढाल पाहायला मिळू शकते. झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये खूप मोठी हालचाल होण्याचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजारात सुरू असलेल्या चर्चेनुसार प्रसिद्ध चीनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड बुधवारी झोमॅटो लिमिटेड कंपनीमधील आपली 3 टक्के गुंतवणूक हिस्सेदारी विकण्याची शक्यता आहे. अलिबाबा ही चिनी कंपनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोमधील शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमधील कलोजिंग किमतीच्या तुलनेत 5 ते 6 टक्के स्वस्त किमतीत शेअर्स विकू शकते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 1.63 टक्क्यांच्या कमजोरीसह 63.35 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होते. Zomato कंपनीचा निश्चित लॉक-इन कालावधी 23 जून 2022 रोजी पूर्ण झाला, आणि परिणामस्वरूप शेअर्समध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली.

ब्लॉक डील अंतर्गत
सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार ब्लॉक डील अंतर्गत बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी चिनी कंपनी अलीबाबा ग्रुप 5200 दशलक्ष किमतीचे आपले Zomato शेअर्स स्वस्त किमतीत विकण्याची शक्यता आहे. यासाठी व्यवहारासाठी ब्रोकर म्हणून जागतिक ब्रोकर फर्म मॉर्गन स्टॅनली यांची निवड करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा प्रदान करणाऱ्या झोमॅटो कंपनीमध्ये अलीबाबा ग्रुपची एकूण 12.98 टक्के गुंतवणूक भागीदारी होती. यावर्षी ऑगस्ट 2022 मध्ये Uber टेक्नॉलॉजी कंपनीने Zomato मधील आपला 7 टक्के गुंतवणूक वाटा 393 दशलक्ष डॉलर्समध्ये विकला होता.

शेअर्समध्ये जबरदस्त घसरण
Zomato कंपनीच्या शेअर्सचा लॉक इन कालावधी 23 जून 2022 रोजी पूर्ण झाला होता, त्यानंतर या स्टॉक मध्ये कमालीची घसरण झाली होती. तेव्हापासून स्टॉक खालच्या किंमत पातळीवरच ट्रेड करत आहे. झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये 159.75 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मात्र त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली, आणि स्टॉक पुन्हा वर येऊच शकला नाही. जुलै 2021 मध्ये Zomato चा IPO शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची कमाल इश्यूची किंमत 76 रुपये ठरवली होती. स्टॉक लिस्टिंग झाल्यावर Zomato कंपनीचे शेअर्स आपल्या इश्यू किमतीच्या खाली आले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Chinese Ecommerce company Alibaba Group is going to Sell Stock in Zomato Share Price on 30 November 2022.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x