27 December 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK
x

CIBIL Score | कोणताही लोन मिळण्यासाठी क्रेडिट स्कोर महत्वाचा असतो, वारंवार तपासल्यास मोठं नुकसान होतं माहिती आहे?

CIBIL Score

CIBIL Score | सध्याच्या युगात असा एकही व्यक्ती नाही ज्याने कोणत्या कामासाठी कर्ज घेतलेले नाही. आपल्या पगारापेक्षा आपल्या गरजा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक जण आपल्याला हव्या असलेल्या वस्तू कर्ज घेऊन मिळवतात. त्यामुळे वस्तूही मिळते आणि ईएमआय असल्याने कर्जाचे जास्त ओझे वाटत नाही. अशात क्रेडिट स्कोर निट रहावा यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. कारण त्यावर तुम्हाला पुढे कर्ज द्यावे की नाही हे ठरत असते. काही बॅंका आपल्या ग्राहकांना फ्री क्रेडिट स्कोर देतात. त्यात अनेक जण तो वारंवार तपासतात. मात्र असे केल्याने तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जेव्हा कर्ज घ्यायचे असते तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर बॅंक तपासते. साधारणता हा स्कोर ७०० पर्यंत असेल तर बॅंक कर्ज देते. मात्र तुम्ही वारंवार क्रेडिट स्कोर तपासला आहे असे समजल्यास बॅंक कर्ज देण्यास मनाइ करू शकते. कारण असे केल्यावर दिसत असलेल्या क्रेडिट स्कोर मधील काही स्कोर बॅंक स्वत: वजा करते. त्यामुळे तुम्हाला कर्ज दिले जात नाही. क्रेडिट स्कोर वारंवार तपासणे ही एक वाइट सवय आह. तुम्ही जर असे करत असाल तर ते आजच थांबवा. क्रेडिट स्कोर व्यवस्थीत रहावा यासाठी अनेक उपाययोजना आहेत.

रिव्हिव रिपोर्ट पाहा
कर्ज घेण्याआधी तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोरचा रिव्हिव रिपोर्ट तपासला पाहीजे. यातुन तुम्हाला नेमकी सुधारणा कुठे आणि कशी करायची आहे हे लक्षात येईल. यासाठी आधी तुम्ही रिव्हिव रिपोर्ट तपासला पाहिजे. तसेच असे केल्याने जर तुमच्या नावावर इतर कोणी कर्ज घेत आहे हे आढळल्याल तुम्हाला क्रेडिट ब्यूरो कडे त्याची तक्रार करता येइल. अशा चुका शक्यतो बॅंकेने अर्धवट माहिती दिल्याने होतात. मात्र तक्रार केल्यानंतर लगचेच त्यावर कारवाई होउन तुमचा क्रेडिट स्कोर सुधारतो.

वारंवार कर्जासाठी अर्ज करू नका
तुम्ही अडचणीत असताना कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बॅंकेचे काही नियम फॉलो केल्याशिवाय कर्ज दिले जात नाही. अशात कर्ज मंजूर होत नाही म्हणून वारंवार त्यासाठी अर्ज करु नयेत. कारण याचा थेट अहवाल तुमच्या क्रेडिट स्कोरवर दिसत असतो. त्यामुळे तसे करणे टाळा. बॅंक तुम्हाला कर्ज देताना या बाबी देखील तपासते.

जुन्या कर्जाची नोंद घ्या
तुमचे आधिचे कर्ज वेळेत आणि पूर्ण भरलेले असले पाहीजे. तसेच कर्जाची परतफेड झाल्यावर ते खाते बंद केले पाहिजे. जर तुम्ही ते खाते सुरू ठेवले असेल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर दिसतो. यामुळे तुम्हाला कर्ज मिळत नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड झाल्यावर लगेचच खाते बंद करा. जर तुम्ही अर्ज करुनही खाते बंद झाले नसेल तर त्याची तक्रार नोंदवा.

कमितकमी क्रेडिट वापरा
ट्रान्स युनियनच्या सीबील अहवालात तुमचा क्रेडिट वापर किती टक्के आहे हे तपासले जाते. त्यामुळे गरज असल्यासच त्याचा वापर करा, हा वापर शक्यतो ३० ते ३५ टक्क्यांपर्यँतच असावा. त्यापेक्षा जास्त असेल तर तो कमी करा. निदार ५० टक्क्यांपेक्षा कमी वापर होईल याकडे लक्ष द्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : CIBIL Score Checking your credit score too often can hurt you too, stop this habit today 28 October 2022

हॅशटॅग्स

#CIBIL Score(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x