5 November 2024 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Credit Score | तुम्हाला क्रेडिट स्कोअरमध्ये कसा सुधार करावा?, स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी महत्वाचे आहे

credit score

Credit Score : तुम्हाला जर तुमची आर्थिक क्षमता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कसे कराल? तर आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणार आहोत. क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक क्षमतेचे प्रतिबिंब आहे जी तुमची कर्ज घेण्याची क्षमता किती आहे हे दर्शवते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणते मोठे कर्ज घेताना (Loan Application) तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर महत्त्वाचा ठरतो. तुम्ही जेव्हा कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा, बँक क्रेडिट स्कोअरच्या म्हणजे सिबिल स्कोअरच्या आधारे तुमच्या कर्जाची पात्रता ठरवते. ज्यात तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचे आकलन केले जाते. क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोअर असे म्हणतात. तुमचे आर्थिक व्यवस्थापन आणि तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती मजबूत आहे हयांचे आकलन सिबिल स्कोअर वरून केले जाते.

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?
आपल्या आर्थिक आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर यांचा वापर केला जातो. वित्तीय कामासाठी विशेषत: तुम्ही कर्ज घेताना तुमचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा ठरतो आणि ह्यावरून तुमची आर्थिक क्षमतेचे मूल्यांकन केले जाते. तुम्ही जेव्हा कर्जासाठी अर्ज करता त्यानंतर, बँक क्रेडिट स्कोअरच्या आधारे तुमच्या कर्जाची पात्रता ठरवते आणि तुम्ही कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही हे ठरवते. क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोअर (म्हणतात. तुमचे आर्थिक व्यवस्थापन किती मजबूत आहे, तुमचा हे सिबिल स्कोअर सांगतो. हा स्कोअर तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर केली की नाही हे देखील दाखवतो. हा स्कोअर बँकेसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण बँक सुद्धा कर्ज देताना तुमची आर्थिक क्षमता पाहून कर्ज देते, बँक कर्ज देताना आर्थिक धोका होण्याची सर्व शक्यता पडताळते आणि कर्ज देते. क्रेडिट स्कोअर ही एक तीन अंकी संख्या असते. क्रेडिट स्कोअर 300-900 च्या दरम्यान गणला जातो.

क्रेडिट स्कोअर तपासण्याची गरज काय :
RBI च्या नियमानुसार, बँकांनी कर्ज देण्यापूर्वी संबधित अर्जदाराचे सिबिल कन्फर्मेशन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कर्ज चुकण्याची आणि बँकेला नुकसान होण्याची शक्यता कमी होते. जर अर्जदाराचा सिबिल स्कोअर कमकुवत असेल तर बँक कर्ज देण्यास नकार देऊ शकते. आणि कर्ज दिले तरी त्या वरील व्याजदर खूप जास्त आकारले जातील. कारण बँकेच्या मते जेर अर्जदाराचे क्रेडिट व्यवस्थापन कमकुवत असेल किंवा आर्थिक पत चांगली असेल तर तो अर्जदार कर्ज फेडण्यास असमर्थ ठरू शकतो. आजच्या युगात आपण बरेच व्यवहार उधारीवर किंवा क्रेडिटवर करतो. अशा परिस्थितीत, आपला सिबिल स्कोअर उत्तम ठेवणे खूप आवश्यक आहे. आपण सिबिल हा स्कोअर कसा मजबूत करू शकतो ते जाणून घेऊया.

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर भक्कम ठेवण्यासाठीच्या टिप्स :
१) CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर मजबूत करण्यासाठी, घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे देणी किंवा बिल्स वेळेवर भरत चला. उशीरा पेमेंट किंवा पेमेंट डिफॉल्ट झाल्यास, त्याचा थेट परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होईल. एखादे बिल किंवा कर्जाचे ईएमआय डीफॉल्ट होण्याचा अर्थ तुम्ही जबाबदार कर्जदार नाहीत किंवा तुमची कर्ज फेडण्यास असमर्थ आहात. स्वतःच्या आर्थिक क्षमतेपेक्षा आणि आवशकतेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नये आणि खर्च करू नये, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. आवश्यक तेवढेच कर्ज घ्या आणि गरजेपुरता खर्च करा. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर, देय तारखेपूर्वी सर्व पेमेंट करा. क्रेडिट कार्डवर पेमेंट देय नसल्यास, ते तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत करते.

२) आपण जर क्रेडिट कार्ड वारंवार बदलत असाल तर तसे करणे आपला क्रेडिट स्कोअर खराब करू शकते. जोपर्यंत दुसऱ्या कार्डकडून बंपर ऑफर येत नाही तोपर्यंत क्रेडिट कार्ड बदलू नये. कारण नवीन कार्ड वर तुमचे क्रेडिट स्कोअर पुन्हा मोजले जातील. जर तुमची क्रेडिट कार्ड परतफेड वेळेवर होत असेल आणि खर्च नियंत्रणात असेल, तर ते तुमच्या परतफेडीचा मागील रेकॉर्ड मजबूत आहे असे दर्शवते ज्याचा CIBIL स्कोअरवर सकारात्मक परिणाम होतो आणि भविष्यात तुम्ही कर्ज घेण्यास सक्षम आहात हे दर्शवते.

३) तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही विसंगती आली तर, ती ताबडतोब दुरुस्त करा कारण त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअर वर होतो. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी एक वैध पुरावा आवश्यक आहे. क्रेडिट हिस्ट्रीबाबत कोणताही वाद उद्भवल्यास, प्रथम बँकेत जाऊन चौकशी करा आणि असे प्रकरण लवकर निकाली काढा. जर असे आर्थिक वाद सोडवण्यात अयशस्वी झाल्यास CIBIL स्कोअर वर परिणाम होऊ शकतो.

४) आपला सिबिल स्कोअर काही कारणामुळे कमी असू शकतो हे CIBIL स्कोअर कमी असेल, तर क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड किंवा सिक्युअर्ड कार्ड वापरणे कधीही फायदेशीर आहे. मोठ्या खाजगी बँक जसे आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, सिटी बँक द्वारे सिक्युअर्ड कार्ड ची सेवा दिली जाते. हे तुमच्या मुदत ठेवी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या ठेवींवर जारी केले जाते. या कार्डचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही घेतलेले कर्ज देय तारखेपर्यंत परतफेड करण्यास असमर्थ असाल, तर बँक तुमच्या FD किंवा इतर ठेवींमधून निधी कापून घेते. यामुळे तुमचे पेमेंट किंवा देणे वेळेवर चुकवले गेले असेल तर तुमच्या एफडी मधून ते कापून घेतले जाते. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CIBIL score how to improve credit score on 19 July 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x