CIBIL Score | सिबिल स्कोअर सुधारायचा आहे? जाणून घ्या सिबिल स्कोअर झटपट वाढवण्याची युक्ती, हे सोपे मार्ग लक्षात ठेवा
CIBIL Score | आयुष्यात जेव्हा आर्थिक अडचणी येतात तेव्हा ती नोकरी आणि व्यवसाय बघून येत नाही. सर्वांना आयुष्यात एकदा तरी कर्जाची गरज लागतेच. झटपट कर्ज पाहिजे असेल तर तुमचा CIBIL स्कोर चांगला असणे खूप गरजेचे आहे. CIBIL स्कोअर जर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. कर्ज परतफेडीत झालेल्या अगदी किरकोळ चुकीचाही विपरीत परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होऊ शकतो. तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल आणि तुम्हाला त्यात सुधारणा करायची असेल तर कर्जाची परतफेड वेळेवर करा आणि आपल्या आर्थिक व्यवहारात सुधारणा करा.
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काही युक्ती :
कर्ज परतफेड वेळेवर करा :
आपला CIBIL स्कोअर खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, उशिरा कर्जपरत फेड करणे, किंवा कर्जाची थकबाकी भरण्यात विलंब होणे. म्हणून कर्ज घेतले तर ते वेळेवर परतफेड करा. ईएमआय वेळेवर भरा.
क्रेडिट रिपोर्ट तपासा :
समजा तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड वेळेवर केली आणि तुमच्याकडून ते बंद झाले असेल, परंतु प्रशासकीय त्रुटींमुळे तुमचे कर्ज अजूनही सक्रिय दिसत असेल तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअर विपरीत परिणाम होईल हे नक्की. अशा परिस्थितीत तुम्ही तुम्ही तुमचे क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासले पाहिजेत, आणि त्यातील उणीवा दूर केल्या पाहिजेत. यामुळे तुमचा CIBIL स्कोर सुधारेल.
क्रेडिट कार्ड पेमेंट थकबाकी ठेवू नका :
जर तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर सुधारायचा असेल, तर क्रेडिट कार्डची देय रक्कम देय तारखेपूर्वी भरून क्लिअर करत जा. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्ड ची थकबाकी रक्कम वेळेवर भरणे खूप आवश्यक आहे.
लोन गॅरेंटर बनणे टाळा :
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत संयुक्त खातेदार किंवा त्याच्या कर्जाचे जामीनदार होत असाल तर, हे आताच थांबवा. कारण त्या व्यक्तीकडून कर्ज परतफेड वेळेवर न झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअर वर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून लोकांच्या कर्जाचे जामीनदार बनू नका.
एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका :
कर्ज घेताना नुसतं पसारा करून ठेवू नका. एकावेळी एकच कर्ज घ्या आणि तो आधी वेळेवर परतफेड करा. एकापेक्षा जास्त कर्जे घेतल्यास, EMI भरायला विलंब झाला किंवा आर्थिक अडचण आली तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुमचे कर्ज वेळेवर परतफेड होत असेल तर तुमचा CIBIL स्कोअर नक्कीच सुधारेल.
दीर्घ मुदतीसाठी कर्ज घ्या :
कर्ज घेताना कर्जाची मुदत दीर्घ मुदतीसाठी निवडा. त्यामुळे तुमचा EMI कमी होईल आणि ते परतफेड करणे सोपे जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही डिफॉल्टर होणार नाही, आणि तुमचे कर्ज वेळेवर फेडले जाईल. वेळेवर कर्जाची पेमेंट झल्यास तुमचा क्रेडिट स्कोर देखील चांगला होईल.
क्रेडिट मर्यादा वाढवा :
सामान्यतः ग्राहक आपली क्रेडिट मर्यादा कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु बँका आपल्या ग्राहकांना क्रेडिट मर्यादा अधिक ठेवण्याची शिफारस करतात. क्रेडिट मर्यादा जास्त ठेवल्यास तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. आणि तुमच्यावर आर्थिक बोझा पडणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| CIBIL Score Improvement trick without any financial burden with repayment of loan on time on 11 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC