16 April 2025 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani | देशात कोळसा संकट येताच अंबानींकडून 'त्या' विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक

Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani

मुंबई, १३ ऑक्टोबर | सध्या देशात तसेच जगभरात कोळशाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने हरित ऊर्जा क्षेत्रात वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ३ दिवसात कंपनीने ४ परदेशी कंपन्यांशी करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड द्वारे जर्मन कंपनी नेक्सवेफ मध्ये गुंतवणूक (Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani) केली आहे. तसेच डेन्मार्कची कंपनी स्टिस्डल सोबत करार केला आहे.

Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani. Mukesh Ambani’s Reliance Industries has started working fast in the field of green energy. In the last 3 days, the company has entered into agreements with 4 foreign companies. Reliance Industries’ Reliance New Energy Solar Limited has invested in German company Nexwave :

रिलायन्सने म्हटले आहे की, त्यांची उपकंपनी असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने डॅनिश कंपनी स्टिस्डल सोबत करार केला आहे. त्यांचा उद्देश भारतात हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स तयार करणे हा आहे. स्टिस्डल सध्या ते विकसित करत आहे. करारानुसार, स्टिस्डल हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्सशी संबंधित तंत्रज्ञानाला रिलायन्सला परवाना देईल. अंबानींनी पुढील तीन वर्षांत नवीन स्वच्छ ऊर्जा व्यवसायात ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिलायन्सने २०३५ पर्यंत निव्वळ कार्बन न्यूट्रल बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

रविवारी रिलायन्सने क्लिन एनर्जी क्षेत्रातील दोन कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी सौर पॅनेल निर्माता REC Solar Holdings AS मधील १०० टक्के हिस्सेदारी चीन नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनीकडून खरेदी केली आहे. तसेच कंपनीने स्टर्लिंग अँड विल्सन पॉवरमधील ४० टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली. ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधी कार्य करते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani’s Reliance Industries has started working on green energy.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या