19 April 2025 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Coal Crisis In India | चीन-युरोपनंतर आता भारतात वीज संकट | निम्म्या भारतात वीज गुल होणार?

Coal Crisis In India

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर | जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक असलेल्या देशात सध्या कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे उत्तर, मध्य आणि ईशान्येकडिल राज्यांत वीज संकट निर्माण झाले आहे. २० हून जास्त राज्यांत दीर्घकाळ वीज गूल (Coal Crisis In India) होत आहे. वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, दिवाळीपर्यंत वीज संकटातून सुटकेची शक्यता कमी आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात कोळसा खाणींवर अनिष्ट परिणाम झाला. तर वीज निर्मिती केंद्रात एकही दिवस वीज उत्पादन बंद नव्हते. कोळश्याची मागणी तेवढीच राहिली, मात्र पुरवठा थांबला. कोरोना हे वीज संकटाचे प्रमुख कारण आहे. वास्तविक कोरोन सर्वोच्च पातळीत असताना खाणींत मान्सूनपूर्व तयारी आणि दुरुस्ती होऊ शकली नाही. दरम्यान ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वीजेची मागणी १६%नी वाढली. नंतर सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादक भागात मुसळधार पावसाने खाणींत पाणी घुसले. त्यामुळे एप्रिल-मे प्रमाणेच सप्टेंबरमध्ये अनेक दिवस कोळसा पुरवठा ठप्प झाला.

Coal Crisis In India. Severe shortage of coal supply is hitting the country hard. It has started impacting power generation in many states including Punjab, Rajasthan, Delhi and Tamil Nadu :

आता अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. कोरोनाकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उद्योगात जास्तीचे काम सुरू असल्याने वीजेची औद्योगिक मागणी वाढली. दिवसाकाठी ४ अब्ज युनिटहून जास्त मागणी झाली. यापैकी ६५ते ७०% वीज कोळश्यावरील निर्मिती केंद्रातूनच मिळते. ऑक्टोबरच्या पहिल्या ८ दिवसांत मागणीच्या तुलनेत ११.५% कमी कोळसा पुरवठा झाला आहे.

जगभरात कोळशाच्या किमती तिप्पट, त्यामुळेही वाढला दबाव
आयात कोळशाच्या किमती मार्च ते सप्टेंबरपर्यंत ६ महिन्यांतच तिपटीने वाढल्या. त्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची मागणी आणखी वाढली. मागील दशकात २०१८-१९ मध्ये कोळशाची मागणी सर्वाधिक ६४३.७ दशलक्ष टन होती, त्यात ६१.७ दशलक्ष टन आयात कोळसा होता. कोळसा मंत्रालयानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ७२३.३ दशलक्ष टन कोळसा लागेल. मात्र केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले की, साधारणपणे प्रत्येक वीज केंद्रात ४ दिवसांचा साठा असतो, त्यामुळे यास संकट म्हणता येणार नाही. सध्या स्थिती गंभीर असून सरकारचे त्यावर लक्ष आहे. आगामी काळात विजेची मागणी कमी होऊन संकट निवळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. पावसाळा आता संपला आहे. कोळसा पुरवठा वाढत आहे. सात ऑक्टोबरला खणींतून २६८ रॅक कोळसा पाठवण्यात आला आहे.

एप्रिलपासूनच स्थिती बिघडली होती, परिणाम आता दिसताहेत:
एका ऊर्जातज्ज्ञांच्या मते, एप्रिलपासून सुरू असलेला तुटवडा ऑक्टोबरमध्ये संकटस्तरावर पोहोचला. देशातील १३५ औष्णिक वीज केंद्रांपैकी ७२ केंद्रांत ३ दिवसांचा, ५० केंद्रांत ४ ते १० दिवसांचा आणि १३ केंद्रांत १० दिवसांपेक्षा जास्तीचा कोळसा साठा उपलब्ध होता. ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत २०१९ मध्ये ( कोरोना नसतानाचे सामान्य वर्ष) विजेची मागणी प्रतिमहिना १०६.६ अब्ज युनिटची वाढ झाली होती, २०२१ मध्ये याच काळात ती १२४.२ अब्ज युनिट प्रतिमहिना झाली. या दोन्ही वर्षी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा वाटा २०१९ मध्ये ६१.९१ % नी वाढून २०२१ मध्ये ६६.३५ % झाला. अशा रीतीने कोळशाच्या मागणीत १८ % वाढ झाली, तर पुरवठा वाढण्याऐवजी कमी होऊ लागला. त्यामुळे संकट अधिक गंभीर झाले.

केंद्र सरकारने शनिवारी या संकटातून मार्ग काढण्यासाठी विशेष व्यवस्थापन पथकाची (सीएमटी) स्थापना केली. कोळशाच्या दैनंदिन पुरवठ्यावर हे पथक लक्ष ठेवेल. यामुळे कोल इंडिया आणि रेल्वेच्या मदतीने सर्व राज्यांना योग्य पुरवठाही होऊ शकेल. विविध राज्यांशी हे पथक संपर्कात राहील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Coal Crisis In India power outages in half of India.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या