21 November 2024 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Stocks To Buy | हा शेअर 37 टक्के परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस पहा, ब्रोकरेजकडून हा स्टॉक खरेदीचा सल्ला

Stocks To Buy

Stocka To Buy | भारत सरकारची सार्वजनिक उपक्रम असलेली कोळसा कंपनी कोल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कोल इंडियाचा शेअर तेजीत पळत आहे. हा शेअर मजबूत सध्या आपल्या 1 वर्षाच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात कोल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज :
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज कोल इंडिया स्टॉकबाबत अतिशय उत्साही आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI ने आपल्या ग्राहकांना कोल इंडिया शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की कोल इंडियाच्या उत्पादनात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. कोल इंडिया कंपनीने मागील काही वर्षात सकारात्मक परिचलन वाढ राखून ठेवली आहे. पुढील येणाऱ्या काळात कोळशाच्या मागणीत वाढ होत राहिल्यास कोल इंडिया कंपनीला मजबूत फायदा होणार हे नक्की.

पुढील लक्ष किंमत 294 रुपये :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने कोल इंडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये “BUY” रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील येणाऱ्या काळात कोल इंडियाचा शेअर 294 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्या कोल इंडिया शेअरची किंमत 215 रुपये असून, लक्ष किंमत स्पर्श केल्यावर हा स्टॉक 37 टक्के परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की दिवसेंदिवस कोळशाच्या किंमती वाढत चालल्या आहेत, आणि याचा कोल इंडियाला पुढील काळात मजबूत फायदा होईल. कोल इंडिया कंपनीने कोळशाचे उत्पादन वाढवले आहे. कंपनीच्या ऑपरेशनल कामगिरीमध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे.

कोल इंडियाचा व्यापार :
कोल इंडिया कंपनीने आपल्या उत्पादनात जवळपास 20 टक्के वाढ केली आहे. सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीने चालू आर्थिक वर्षात कोळसा उत्पादन पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 19.7 टक्के वाढवून 299 दशलक्ष टन केले आहे. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी 80 टक्के कोळसा उत्पादन कोल इंडिया करते. एक वर्षभरापूर्वी कोल इंडियाने 2498 दशलक्ष टन कोळसा उत्पादन केले होते. कंपनीने चालू आर्थिक वर्षात आपले कोळसा उत्पदांचे लक्ष 700 दशलक्ष टन निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात कोल इंडिया कंपनीने 43 टक्के निर्धारित लक्ष्य साध्य केले आहे. कोल इंडियाने सप्टेंबर 2022 मध्ये 45.7 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले होते जे मागील वर्षीच्या तुलनेत 407 दशलक्ष टन होते.

कोल इंडिया शेअरचे मूल्यांकन :
ब्रोकरेज फर्मने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात कोल इंडिया कंपनीचा स्टॉक सध्या आर्थिक वर्ष 2024 च्या 5.7x P/E आणि 2.4x EV/EBITDA प्रमाणे ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की कंपनी आपल्या भागधारकांना पुढील काळात मजबूत लाभांश देऊ शकते. यापुढे कोल इंडियाचा स्टॉक तेजीत व्यापार करण्याचा अंदाज आहे. चालू वर्षात आतापर्यंत कोल इंडिया स्टॉकमध्ये 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Coal India Limited Stock recommended to Buy from ICICI securities firm for high returns on investment on 07 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x