22 January 2025 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • Coal India Share Price 
  • विक्रीसाठी ऑफर फॉर सेलचा आकार 4,000 कोटी रुपये
  • फ्लोअर प्राइस डिटेल
  • केंद्र सरकार 3 टक्के भाग भांडवल विकणार
Coal India Share Price

Coal India Share Price | भारत सरकार देशातील सर्वात मोठी कोळसा कंपनी कोल इंडिया लिमिटेडमधील भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. भारत सरकार आज गुरुवार दिनांक 1 जून 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर ऑफर फॉर सेल अंतर्गत कोल इंडियामधील भाग भांडवल विकणार आहे.

विक्रीसाठी ऑफर फॉर सेलचा आकार 4,000 कोटी रुपये

सरकारने विक्रीसाठी ऑफर फॉर सेलचा आकार 4,000 कोटी रुपये निश्चित केला आहे. बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा ऑफर फॉर सेल खुला करण्यात येणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार शुक्रवार दिनांक 2 जून पर्यंत बोली लावू शकतात. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के घसरणीसह 229.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फ्लोअर प्राइस डिटेल

भारत सरकारने कोल इंडिया कंपनीचा ऑफर फॉर सेलची फ्लोअर किंमत 225 रुपये जाहीर केली आहे. कोल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 241.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या ऑफर फॉर सेल मुळेच आज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. विक्रीची ऑफर स्टॉक एक्स्चेंजवर 1-2 जून रोजी ओपन केली जाईल.

मागील एका वर्षात कोल इंडिया कंपनीच्या शेअरने लोकांना 17.14 टक्के नफा कमावून दिला आहे. कोल इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 263.30 रुपये होती. तर कोल इंडिया कंपनीमध्ये भारत सरकारने एकूण 66 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

केंद्र सरकार 3 टक्के भाग भांडवल विकणार

भारत सरकार कोल इंडिया कंपनीमधील 3 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. SBI कॅप या ऑफर फॉर सेलमध्ये ब्रोकर म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. भारत सरकार OFS द्वारे सुमारे 9.24 कोटी शेअर्स विकून प्रॉफिट बुकींग करणार आहे. ओव्हर सबस्क्रिप्शनच्या केसमध्ये सरकार अतिरिक्त 1.5 टक्के विकणार आहे. 2010 मध्ये , कोल इंडिया कंपनीने IPO अंतर्गत 10 टक्के शेअर्स 245 रुपये प्रति शेअर किमतीवर विकून सुमारे 15,200 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Coal India Share Price today on 01 June 2023.

हॅशटॅग्स

#Coal India Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x