23 April 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार; मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL
x

Committed Cargo Care IPO | कमिटेड कार्गो केअर IPO स्टॉक सूचीबद्ध झाला, पहील्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे वाढले

Committed Cargo Care IPO

Committed Cargo Care IPO | कमिटेड कार्गो केअर या थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. कमिटेड कार्गो केअर कंपनीचा IPO स्टॉक 77 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. तर कमिटेड कार्गो केअर कंपनीचे शेअर्स बाजारात 82 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

कमिटेड कार्गो केअर कंपनीचा IPO स्टॉक लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली. आणि शेअरची किंमत 5 टक्क्यांच्या वाढीसह 86.10 रुपये किमतीवर पोहोचले होते.

कमिटेड कार्गो केअर या कंपनीचा IPO 87 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. कमिटेड कार्गो केअर कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 78.73 पट सबस्क्राइब झाला होता. तर इतर श्रेणींमध्ये हा IPO स्टॉक 94.20 पट सबस्क्राईब झाला होता.

कमिटेड कार्गो केअर कंपनीचा IPO लाँच होण्यापूर्वी प्रवर्तकांनी कंपनीचे 98 टक्के भाग भांडवल धारण केले होते. IPO नंतर आता प्रवर्तकांचा वाटा 68.63 टक्केवर आला आहे. कमिटेड कार्गो केअर कंपनीच्या IPO चा एकूण आकार 24.98 कोटी रुपये होता. या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार फक्त 1600 शेअर्सचा एक लॉट खरेदी करू शकत होते.

कमिटेड कार्गो केअर कंपनीने आपल्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 1600 शेअर्स जारी केले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 123200 रुपये जमा करावे लागले होते. कमिटेड कार्गो केअर कंपनीचा IPO 6 ऑक्टोबर 2023 ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत बँड 77 रुपये जाहीर केली होती.

कमिटेड कार्गो केअर कंपनीचे शेअर्स आता एनएसई एसएमई इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. कमिटेड कार्गो केअर कंपनीची स्थापना 1998 साली करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स सेवा प्रदान करण्याचे काम करते. यासह ही कंपनी मालाचे आयात आणि निर्यात यासारखे एकात्मिक सेवा देखील प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Committed Cargo Care IPO on 19 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Committed Cargo Care IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या