15 November 2024 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Credit Card | क्रेडिट कार्ड जरा जपून वापरा, नाही तर तुम्हाला नकळत नुकसान होण्याची शक्यता आहे

credit Card

Credit Card | जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याद्वारे खरेदी केली असेल, तर ते वापरताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी आनंद कमी आणि मनस्ताप जास्त देऊ शकते. सणासुदीच्या हंगामात लोकांची खरेदी चालू होते आणि या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. घर सजवण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी, मित्र आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी, जोरदारपणे खरेदी केली जाते. मात्र, खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्याल तर नकळत होणारे नुकसान टाळू शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करत असाल, तर ते वापरताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी कधी कधी मनस्ताप देऊन जाते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर :
आर्थिक व्यवहार करताना जर क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर हे एक फायदेशीर आर्थिक साधन आहे जे नेहमी आपल्याला वेगवेगळे फायदे देऊन जाईल. आर्थिक अडचणीच्या वेळी क्रेडिट कार्ड तुम्हाला नक्कीच आधार देईल. तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर आर्थिक अडचण जाणवल्यास तुम्हाला कोणाकडे कर्ज मागायची वेळ येणार नाही. अल्प कालावधीसाठी पैशाची गरज असेल तर क्रेडिट कार्डद्वारे आपली गरज भागवू शकत. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरल्यास बोनस पॉइंट्सदेखील मिळतात आणि तुमचा क्रेडिट स्कोअर देखील सुधारतो. म्हणून, क्रेडिट कार्डाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, त्याचा वापर सुज्ञपणे करणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा :
खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याची बिले निर्धारित वेळेत भरावी.ज्याने तुम्हाला क्रेडिट पॉइंट्स मिळतील आणि तुमचा सिबिल स्कोअर ही सुधारेल. बिल पेमेंटमध्ये जर विलंब झाला तर जास्त व्याज दर आकारला जातो. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअरचे योग्य मूल्यांकन होईल आणि क्रेडिट स्कोअर सुधारण्यात मदत होईल.

बिलिंग सायकलच्या सुरुवातीलाच खरेदी करा :
प्रत्येक क्रेडिट कार्डला एक बिलिंग सायकल असते. कार्डवर खरेदी केलेल्या वस्तूंचं बिल महिन्यात एकदा तयार होतं त्याला बिल डेट म्हणतात. त्यानंतर साधारणतः तुम्हाला बिल भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाते.चालू महिन्याच्या बिलाच्या तारखेपासून पुढच्या महिन्याच्या बिलाच्या तारखेपर्यंतच्या काळाला बिलिंग सायकल म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही बिल निघाल्यानंतर दुसऱ्यादिवशी खरेदी केली तर तुम्हाला जास्त वेळ पैसे वापरायला मिळतील त्यामुळे सुरुवातीलाच खरेदी करा.

बिल स्टेटमेंट तपासा:
क्रेडिट कार्डने खरेदी करताना कार्ड स्टेटमेंट तपासावीत आणि आपल्या देय क्षमतेनुसार खर्च करावा गरजेपेक्षा जास्त खर्च करू नये. स्टेटमेंट वेळोवेळी तपासले पाहिजेत आणि ते वेळेवर भरले गेले पाहिजे. यामध्ये रिवॉर्ड पॉइंट्स सारख्या फायद्यांची माहिती मिळत राहते. असे केल्यास तुम्हला क्रेडिट कार्डचा अधिक लाभ होऊ शकतो.

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट :
क्रेडिट कार्ड स्टेटमेंट हे एक विशिष्ट बिलिंग सायकलमध्ये तुमच्या क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व व्यवहारांचं बिल असतं. यात तुमच्या कार्डाशी संबंधित सर्व माहिती असते. जसे एकूण देण्याची रक्कम, सर्वात कमी पेमेंट रक्कम, रक्कम भरण्याची शेवटची तारीख, क्रेडिट मर्यादा, तुम्ही कमावलेले रिवॉर्ड पॉइंट्स, रिडीम न केलेले पॉइंट्स ही माहिती असते.

क्रेडिट कार्डचे फायदे :
तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यावर काही रिवॉर्ड पॉइंट मिळतात. जर तुम्ही 50 दिवसांच्या आत बिले भरल्यास कोणतेही व्याज भरण्याची गरज पडत नाही. तसेच गरज पडल्यास रोख रक्कम कर्ज म्हणून घेता येते.

क्रेडिट लिमिट निवडताना खबरदारी :
प्रत्येक क्रेडिट कार्डावर एक क्रेडिट लिमिट असते. क्रेडिट लिमिट असणं म्हणजे तुम्हाला बँकेकडून निश्चित करण्यात आलेली ठराविक रक्कम खर्च करता येते. क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना, क्रेडिट कार्ड मर्यादा निवडताना योग्य काळजी घेतली पाहिजे. तुमचे उत्पन्न, बिल भरण्याची तारीख आणि खर्च लक्षात घेऊन क्रेडिट लिमिट निश्चित करा. त्यामुळे नीट वापरलं तर क्रेडिट कार्ड खूप फायद्याचं आहे पण निश्चित तारखेपेक्षा उशिरा पैसे भरले तर जबरदस्त व्याज बँकाकडून लावले जातात आणि भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे सावधपणे क्रेडिट कार्ड वापरायला हवं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Credit card benefits check details on 20 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x