17 April 2025 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Credit Card Payment | क्रेडिट कार्ड बिलिंगचे नविन नियम तुम्हाला माहित आहेत का?, नियम तुमच्या फायद्याचा आहे का?

Credit Card Payment

Credit Card Payment | क्रेडिट कार्ड वापरताना त्याचे सर्व फायदे तोटे यासह पेमेंट सायकल समजूण घेणे गरजेचे आहे. ज्या कालावधीलाठी तुमचे क्रेडिट कार्ड बिल तयार करते त्याला पेमेंट सायकल किंवा बिलिंग सायकल असे म्हणतात. आर्थिक नियोजन करताना त्याची माहिती असणे गरजेचे असते. यामुळे व्याज शुल्क आणि विलंब झाल्यास आकारला जाणारा दंड यात मोठी सुट मिळवता येते.

नुकतेच क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी हे अपडेट आले आहे. या आधी जेव्हा तुम्ही एकदा क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरूवात केली तर त्याची बिलिंग सायकल नश्चित राहत होती. मात्र रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने रेपो दरासह बिलिंगमध्ये देखील बदल केले आहेत. आता तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा बिलिंग कालावधी एकदा बदलू शकता. अनेक क्रेडिट कार्ड वापरकर्ते त्यांना दिलेल्या कालावधीचे निट पालन करत नाहीत. त्यामुळे नियामकने हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र हा नियम खरोखर तुमच्या फायद्याचा आहे का हे जाणून घेऊ.

शेवटचे आणि सध्या सुरू असलेल्याच्या पुढचे या मध्ये बिलिंग कालावधी आहे. तुमची बॅंक किंवा जेथून तुम्ही क्रेडिट कार्ड मिळवले आहे तेथून तुमचा कालावधी २८ ते ३१ दिवसांचा ठरवलेला असतो. जर तुमच्या कालावधीतील व्यवहाराचा तपशील १९ तारखेला दिसणार असेल तर बिलिंग सायकल चालू महिन्याच्या २० ते मागिल महिन्याच्या २० तारखेवर धरला जातो. यात तुम्ही किती पैसे वापरले, कुणाला पाठवले असे सर्वच तपशील त्या त्या महिन्याला दिसतात. आता केलेल्या मासिक क्रेडिट कार्ड बिलिंगचा तपशील पुढील महिन्यात दाखवला जात नाही.

मात्र आता क्रेडिट कार्डच्या बिलिंग सायकलमध्ये बदल केल्याने अनेक फायदे होणार आहेत. एक वेळा क्रेडिट कार्डच्या कालावधीत बदल करता येत असल्याने आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे जाईल. यामुळे तुमचे पैसे कधी कसे खर्च करायचे आहेत याचे व्यवस्थापन तुम्हाला करता येईल. जर तुम्ही एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नविन नियमाचा तुम्हाला अधिक फायदा घेता येईल. यासाठी वेगवेगळ्या क्रेडिट कार्डची बिलिंग तारिख लक्षात ठेवण्याची गरज नाही. एकच तारिख सर्व कार्डसाठी ठरवता येऊ शकते. पगार धारक व्यक्ती नेहमी जास्त क्रेडिट कार्ड वापरतात. त्यामुळे त्यांच्या बचतीत याचा फायदा होतो. बिलिंगची तारीख शक्यातो पगाराच्या दुस-चा दिवसाचीच निवडावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Credit Card Payment Do you know the new rules for credit card billing? 29 October 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Credit card payment(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या