15 January 2025 3:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News

Highlights:

  • Credit Score
  • सर्वप्रथम क्रेडिट स्कोर म्हणजे काय हे जाणून घेऊया
  • जास्त लोन एकाच वेळी घेऊ नका
  • लोन फेडण्यास प्राथमिकता द्या
  • क्रेडिट लिमिट संपवू नका
  • सुरक्षित लोन बनवा
  • क्रेडिट रिपोर्ट सतत चेक करा
Credit Score

Credit Score | चांगल्या दर्जाच्या लोनची ऑफर मिळण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर अतिशय मजबूत असला पाहिजे. क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या व्याजाचे देखील लोन मिळू शकते. परंतु काहीवेळा अनेक व्यक्ती लोन घेताना काही शिल्लक चुका करतात. या चुकांमधूनच तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. कधी कधी तुम्ही व्याजाची चांगली रक्कम फेडणार असला तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या कर्जाची ऑफर मिळत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे एक क्रेडिट स्कोर. क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचा याबद्दल जाणून घ्या सर्व काही.

सर्वप्रथम क्रेडिट स्कोर म्हणजे काय हे जाणून घेऊया:
क्रेडिट स्कोर म्हणजे एक प्रकारची संख्याच असते. ही संख्या तुमचा क्रेडिट स्कोर चांगला आहे की वाईट हे दर्शवते. शक्यतो क्रेडिट स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान असावा. जर तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा वर असेल तर, तुम्हाला चांगलं लोन मिळण्याची शक्यता असते. म्हणजेचं जेवढा उंच स्कोर तेवढच लोन चांगलं मिळतं. परंतु तुमच्या क्रेडिट स्कोरची संख्या यापेक्षा कमी असेल तर बँकांकडून तुम्हाला चांगले लोन ऑफर केलेत जात नाही. कारण की बँकांना कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नसते.

दरम्यान तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवायचा असेल तर, बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ब्लॉगमध्ये सर्व सामान्यांसाठी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वाढवू शकता.

जास्त लोन एकाच वेळी घेऊ नका :
काही व्यक्ती एकाच वेळी अनेक प्रकारचे लोन घेऊन बसतात. त्यानंतर याचा थेट परिणाम त्यांच्या ईएमआयवर होताना पाहायला मिळतो. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर देखील खराब होऊ शकतो. जर तुम्ही जास्त पैशांचे लोन घेतले असेल तर वेळोवेळी फेडलेच पाहिजे. नाहीतर याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर पाहायला मिळतो.

लोन फेडण्यास प्राथमिकता द्या :
क्रेडिट स्कोर वाढण्यासाठी तुम्ही वेळोवेळी ईएमआय भरणे गरजेचे आहे. जर तुम्ही जास्त पैशांचे लोन घेतले असेल तर लोन पेडण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा अधिक कार्य काळ वाढवून घ्या. बऱ्याचदा अकाउंटमध्ये पैसे असतात परंतु, काही कारणांमुळे पेमेंट करायला वेळच मिळत नाही. अशावेळी तुम्ही ऑटो पे किंवा ऑटो डेबिट यांसारख्या पर्यायांचा वापर करू शकता. या पर्यायांमुळे ठराविक तारखेला आधी ठराविक वेळेला तुमच्या खात्यातून एमआयचे पैसे कट होऊन वेळोवेळी पेमेंट होत राहील. ही ट्रिक वापरल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर अजिबात डगमगणार नाही.

क्रेडिट लिमिट संपवू नका :
क्रेडिट स्कोर वाढण्यासाठी आणि बँकांसमोर अनुशासित ग्राहक बनण्यासाठी क्रेडिट कार्डची लिमिट संपू देऊ नका. कारण की क्रेडिट कार्डची एक ठराविक लिमिट दिली जाते.

सुरक्षित लोन बनवा :
समजा तुम्ही आधीच क्रेडिट कार्डचे बिल एमआयमध्ये ट्रान्सफर केले असतील तर, पर्सनल लोन घेण्याची चूक करू नका. पर्सनल लोन ऐवजी तुम्ही गोल्ड लोन घेऊ शकता. म्हणजेच ईएमआय शॉपिंग, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड या गोष्टींचा नियंत्रण ठेवा.

क्रेडिट रिपोर्ट सतत चेक करा :
बऱ्याचवेळा क्रेडिट कार्डमध्ये झालेल्या चुका सुधारल्या जाऊ शकत नाहीत. अशावेळी तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट सतत चेक करत राहिला पाहिजे. सतत चेक केल्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका पटकन समजून येतील आणि तुम्ही त्यावर चांगलं काम देखील करू शकाल.

Latest Marathi News | Credit Score for loan 18 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

credit score(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x