31 January 2025 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

Cyient Share Price | अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर, अल्पावधीत 345% परतावा, तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली

Cyient Share Price

Cyient Share Price | शेअर बाजारात कोणता शेअर गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत करेल, हे सांगता येत नाही. असाच एक स्टॉक आहे, सायएंट लिमिटेड. सायएंट लिमिटेड या मिडकॅप आयटी कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चौपट वाढवले आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे.

गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 1,706.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी सायएंट लिमिटेड स्टॉक 2.21 टक्के घसरणीसह 1,645.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये सायएंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स चार टक्क्यांनी मजबूत झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना महिन्यात 10.59 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने या आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 53 टक्के वाढवले आहेत.

2023 या वर्षात सायएंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मध्ये आतापर्यंत या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना 101.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील तीन वर्षांत सायएंट लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 345 टक्के वाढली आहे.

जर तुम्ही 25 सप्टेंबर 2020 रोजी सायएंट लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4,45,572 रुपये झाले असते. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2,15,000 रुपये झाले असते.

ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सायएंट लिमिटेड कंपनीच्या शेअरवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. ओव्हरवेट रेटिंगचा अर्थ ब्रोकरेज फर्मला हा स्टॉक बेंचमार्क इंडेक्स आणि उद्योगाच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. मॉर्गन स्टॅन्ले फर्मने सायएंट लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 2,000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Cyient Share Price today on 9 October 2023

हॅशटॅग्स

#Cyient Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x