21 January 2025 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO
x

Cyrus Mistry | टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं पालघर येथे रस्ते अपघातात निधन

Cyrus Mistry

Cyrus Mistry | टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी मुंबईजवळील पालघर येथे रस्ते अपघातात निधन झाले. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात झाला. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात असल्याचं दिसत आहे. कारचालकासह त्याच्यासोबत प्रवास करणारे अन्य दोघे जखमी झाले. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिस्त्री यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सूर्या नदी चारोटी पुलावर हा अपघात झाला. वास्तविक, सायरस मिस्त्री आपल्या तीन सहकाऱ्यांसह अहमदाबादहून मुंबईला येत होते. दरम्यान, पालघरजवळ झालेल्या रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हिंग सीटवर एक महिला होती. मिस्त्री बाजूच्या सीटवर बसले होते. मागे आणखी दोन जण बसले होते. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा पुढचा भाग उडून गेला. हा अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

सायरस पालोनजी मिस्त्री हे उद्योगपती होते ते २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. पुढे टाटा समूहाने २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Cyrus Mistry died in road accident at Palghar check details 04 September 2022.

हॅशटॅग्स

#Cyrus Mistry(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x