25 December 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

DB Realty Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत डीबी रिअ‍ॅल्टी शेअरने 195% परतावा दिला, पुढे अजून मल्टिबॅगर कमाई करा

DB Realty Share Price

DB Realty Share Price | डीबी रिअ‍ॅल्टी लिमिटेड या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपनीने कन्व्हर्टेबल वॉरंटच्या प्रेफरंस इश्यूद्वारे 1544 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. डीबी रिअ‍ॅल्टी कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, सर्व परिवर्तनीय वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डीबी रियल्टी कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डीबी रिअ‍ॅल्टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 174.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी डीबी रिअ‍ॅल्टी लिमिटेड स्टॉक 2.85 टक्के वाढीसह 176.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 6 महिन्यांत डीबी रिअ‍ॅल्टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 195 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. कर्ज कमी करण्यासाठी आणि भांडवल वाढवण्यासाठी कंपनीने सर्व परिवर्तनीय वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केल्याची माहिती दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये दोन टप्प्यात प्रवर्तक गट आणि गुंतवणूकदारांकडून कंपनीने निधी जमा केला आहे.

पिनॅकल इन्व्हेस्टमेंट, रेखा झुनझुनवाला आणि RARE इन्व्हेस्टमेंट यांना डीबी रिअ‍ॅल्टी लिमिटेड कंपनीने अनुक्रमे 17.94 टक्के, 2 टक्के, आणि 2 टक्के इक्विटी शेअर्स जारी केले आहेत. कंपनीचे गुंतवणुकदार अभय चांडक आणि आदित्य चांडक यांना देखील डीबी रिअॅल्टी लिमिटेड कंपनीने प्रत्येकी 2-2 टक्के शेअर्स जारी केले आहेत.

जून 2023 तिमाहीमधील शेअर होल्डिंग आकडेवारीनुसार रेखा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये डीबी रिअॅल्टी लिमिटेड कंपनीचे 1.21 टक्के भाग भांडवल आहे. मागील 6 महिन्यांत डीबी रिअॅल्टी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 195 टक्के परतावा कमावून दिला आहे.

28 मार्च 2023 रोजी डीबी रिअॅल्टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 58.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 सप्टेंबर 2023 रोजी डीबी रिअॅल्टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 171.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात डीबी रिअॅल्टी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 55.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DB Realty Share Price today on 20 September 2023

हॅशटॅग्स

DB Realty Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x