23 December 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch
x

Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या गुंतवणूक कंपनीकडून या स्टॉकची खरेदी आणि शेअर तेजीत, गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत

Jhunjhunwala Portfolio

Jhunjhunwala Portfolio | शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून विक्रीचा दबाव दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या गोंधळाने भारतीय शेअर बाजारही गडगडला आहे. यूएस सेंट्रल बँकेकडून व्याजदर आक्रमकपणे वाढवले जात आहेत, आणि या भीतीने जागतिक बाजारात नकारात्मक भावना पसरली आहे. जगात आर्थिक मंडी येण्याचे भाकीत केले जात आहेत. मंदीच्या काळात एक स्टॉक रॉकेट सारखा वर जात आहे. आणि त्याने आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा स्टॉक दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये देखील आहे.

जाणून घ्या स्टॉकबद्दल :
शेअर बाजारात बऱ्याच काळापासून चढ-उतार पाहायला मिळत आहे, त्यातही राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक डीबी रियल्टी कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किटला स्पर्श केला आहे. आज डीबी रियल्टीचा स्टॉकची 108 रुपये किमतीवर ओपनिंग झाली आणि स्टॉक 113.15 च्या किमतीला 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. डीबी रियल्टीने नुकताच स्टॉक एक्सचेंजला उपकंपनी, डीबी मॅनच्या संपूर्ण अधिग्रहणाबद्दल माहिती दिली होती, ज्यामध्ये कंपनीने 91 टक्के वाटा अधिग्रहित केला आहे. यानंतर डीबी मॅन ही कंपनी आता डीबी रियल्टीची पूर्ण मालकीची कंपनी झाली आहे. ही घोषणा कंपनीसाठी खूप सकारात्मक ठरली आहे.

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
एप्रिल ते जून 2022 या कालावधीसाठी डीबी रियल्टी कंपनी छ शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावावर कंपनीचे 5 दशलक्ष शेअर्स म्हणजेच 1.73 टक्के गुंतवणूक होती. एवढेच नाही तर राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीतील गुंतवणूक स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या स्टॉकने वर्ष-दर-वर्ष/YTD प्रमाणे गुंतवणूकदारांचे पैसे दोन पट अधिक वाढवले आहेत. डीबी रियल्टी शेअरची किंमत 49 रुपये होती, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 113.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DB realty stock included in Jhunjhunwala Portfolio has given tremendous return on investment on 12 October 2022.

हॅशटॅग्स

#Jhunjhunwala Portfolio(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x