18 November 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Deepak Nitrite Share Price | मालामाल व्हा! 12000 टक्के परतावा देणारा दीपक नायट्रेट शेअर पुन्हा तेजीत, खरेदी वाढली

Highlights:

  • दीपक नायट्रेट शेअर
  • दीपक नायट्रेट बाबत सकारात्मक बातमी
  • सविस्तर करार तपशील
  • गुंतवणूकीवर परतावा
Deepak Nitrite Share Price

Deepak Nitrite Share Price | ‘दीपक नायट्रेट’ या स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 2160 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.

दीपक नायट्रेट बाबत सकारात्मक बातमी
काल या स्टॉकमध्ये इतकी जबरदस्त तेजी एका सकारात्मक बातमीमुळे आली होती. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे. या करारात कंपनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के घसरणीसह 2,075.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सविस्तर करार तपशील :
‘दीपक केम टेक’ या ‘दीपक नायट्रेट’ च्या उपकंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे. त्यामुळे दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. दीपक केम टेक ही कंपनी विशेष रसायनांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी पुढील चार वर्षांत गुजरात राज्यात 5,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

या उद्देशाने ‘दीपक नायट्रेट’ कंपनीने गुजरात सरकारसोबत MOU केला आहे. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे गुजरात राज्यात 1,500 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.

गुंतवणूकीवर परतावा :
‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 2011 मध्ये या कंपनीचे शेअर्स 15 रुपयेवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2,075.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 12 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 12000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने 760 टक्के आणि तीन वर्षात 330 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,355.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deepak Nitrite Share Price today on 25 May 2023.

FAQ's

How to Buy Deepak Nitrite Share?

आपण दीपक नायट्रेट शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Deepak Nitrite?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. २५ मे २०२३ रोजी दीपक नाइट्राइटच्या शेअरची किंमत रु.२,०७३ आहे.

What is the Market Cap of Deepak Nitrite?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 25 मे 2023 पर्यंत दीपक नाइट्राइटचे मार्केट कॅप 29,121 कोटी रुपये आहे.

What is the PE and PB ratio of Deepak Nitrite?

दीपक नाइट्राइटचे पीई आणि पीबी गुणोत्तर 25 मे 2023 रोजी 34.1779 आणि 7.12055 आहे.

What is the 52 Week High and Low of Deepak Nitrite?

५२ आठवड्यांचा उच्चांक/नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) दीपक नाइट्राइटच्या शेअरने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी भाव आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. २५ मे २०२३ रोजी दीपक नाइट्राइटचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी आणि नीचांकी भाव रु.२,३५५.५५ आणि रु.१,६८२.१५ आहे.

हॅशटॅग्स

#Deepak Nitrite Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x