23 December 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Delhivery Share Price | डेल्हीवरी कंपनीचे शेअर 52% स्वस्त झाले आहेत, आता स्टॉकबाबत महत्वाची अपडेट आली

Delhivery Share Price

Delhivery Share Price | ‘डेल्हीवरी लिमिटेड’ या लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती, मात्र आज पुन्हा स्टॉक लाल निशाणीवर घसरला आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 340.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सात ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत होती. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5.8 टक्के वाढीसह 358.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल S&P BSE सेन्सेक्स 0.4 टक्क्यांच्या वाढीसह 60,921 अंकावर ट्रेड करत होता. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही सकारात्मक वाढ पाहायला मिळाली होती, मात्र स्टॉक ही तेजी टिकवू शकला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)

कंपनीची तिमाही कामगिरी :
नुकताच ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीने आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला 195.7 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 126.5 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. त्याच वेळी सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीला 254 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे एकूण उत्पन्न डिसेंबर 2022 तिमाहीत घसरुन 1918 कोटी रुपयेवर आले आहे, जो मागील वर्षी 2019 कोटी रुपये होता. नुकताच कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीच्या गैर कार्यकारी स्वतंत्र संचालक ‘कल्पना जयसिंग मोरपारिया’ यांनी 11 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचा IPO मे 2022 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO शेअरची इश्यू किंमत 462-487 रुपये दरम्यान निश्चित केली होती. शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत हा स्टॉक 708.45 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. म्हणजेच स्टॉक सध्या आपल्या उच्चांक किमतीपेक्षा 52 टक्के खाली ट्रेड करत आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 291 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Delhivery Share Price 543529 stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

#Delhivery Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x