17 April 2025 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Dishman Carbogen Amcis Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 11 दिवसात 50% परतावा, काल 1 दिवसात 14% परतावा, स्टॉक डिटेल्स पहा

Dishman Carbogen Amcis Share Price

Dishman Carbogen Amcis Share Price | मागील बऱ्याच काळापासून फार्मा सेक्टर मंदीच्या छायेत ट्रेड करत आहे. मात्र आता एका फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत रिकव्हरी पाहायला मिळत आहे. या फार्मा कंपनीचे नाव आहे, ‘डिशमन कार्बोजेन मिक्स’. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिशमन कार्बोजेन कंपनीचे शेअर 14 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह 125.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.48 टक्के घसरणीसह 117.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 201.35 रुपये होती. ते या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 80.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Dishman Carbogen Amcis Share Price | Dishman Carbogen Amcis Stock Price | BSE 540701 | NSE DCAL)

11 दिवसात 50 टक्के उसळी :
‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून कमालीची वाढ पाहायला मिळत होती. तर मागील 11 ट्रेडिंग सेशनपासून या फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 81.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 122 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के पेक्षा जास्त वर गेले आहेत. 2023 या नवीन वर्षात या फार्मा कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टक्के वाढली आहे.

1 वर्षात 27 टक्के घसरण :
‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 27.60 टक्क्यांनी खाली आले आहेत. तर 22 फेब्रुवारी 2022 रोजी या फार्मा कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 168.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्सवर 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 122 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीचे शेअर्स मागील 5 वर्षांत 63 टक्के कमजोर झाले आहेत. कोरोना काळात ‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी BSE इंडेक्सवर 48.85 रुपयांवर आले होते. ही कंपनीने अनेक देशांमध्ये काम करत आहे. कंपनी स्वित्झर्लंड, यूके, फ्रान्स, नेदरलँड्स, चीन, या देशामध्ये विकास प्रकल्प सुरू केले आहेत.

गुंतवणूकीचा ओघ :
‘अॅनव्हिल वेल्थ मॅनेजमेंट’ फर्मने या कंपनीत मोठी गुंतवणुक केली आहे. संपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने ‘डिशमन कार्बोजेन’ या फार्मा कंपनीचे 0.76 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ‘अॅनव्हिल वेल्थ मॅनेजमेंट’ ने ‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीचे शेअर्स 99.44 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले आहेत. ‘डिशमन कार्बोजेन’ कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली असून कंपनीने तिमाही नफ्यात 32.7 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीला याकाळात 46.96 कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 35.38 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dishman Carbogen Amcis Share Price 540701 DCAL stock market live on 22 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dishman Carbogen Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या