15 November 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Dividend Declared | तुमच्याकडे या कंपनीचे शेअर्स आहेत?, गुंतवणूकदारांना 800 टक्के डिव्हिडंड जाहीर

Dividend Declared

Dividend Declared | कंपन्यांचे तिमाही निकाल समोर येत आहेत. एकीकडे गुंतवणूकदार त्याकडे पाहून पुढील धोरण आखत आहेत, त्याचवेळी कंपन्याही या आधारावर लाभांश देण्याचा निर्णय घेत आहेत. वित्त क्षेत्रातील कंपनी क्रिसिल लिमिटेडच्या शेअर्सनी यावर्षी 14.05% परतावा दिला आहे. आता कंपनीच्या तिमाही निकालाने व्यवस्थापनासह गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नफा कमावल्यानंतर क्रिसिलच्या पात्र भागधारकांना 800 टक्के लाभांश देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

पहिल्या तिमाहीत कंपनीला किती नफा झाला :
कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत 26.5 टक्के अधिक महसूल मिळाला आहे. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला 668.5 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत यावेळी कर भरल्यानंतरचा नफा 35.8 टक्क्यांनी वाढून 136.9 कोटी रुपये झाला आहे. क्रिसिलने एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने एक रुपयाच्या दर्शनी मूल्यावर आठ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी हे पेमेंट करण्यात येणार आहे.

या स्टॉकची कामगिरी कशी आहे :
गेल्या एक महिन्याबद्दल बोलायचे झाले तर एनएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सनी 3.08% रिटर्न दिला. गेल्या सहा महिन्यांविषयी बोलायचे झाले तर क्रिसिलने गुंतवणूकदारांना 18.16 टक्के परतावा दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 2779.5 रुपयांवरून 3284.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. तर सन 2022 मध्ये आतापर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना 14.05 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात शेअर बाजारात अनिश्चिततेचे ढग दाटून आले असतानाही या शेअरने गुंतवणूकदारांना निराश केले नाही. या काळात या शेअरने गुंतवणूकदारांना 8.77% परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dividend Declared by CRISIL Limited is 800 percent check details 24 July 2022.

हॅशटॅग्स

#Dividend Declared(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x