25 April 2025 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या
x

DRC Systems Share Price | 31 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 2 दिवसात दिला 40% परतावा, खरेदीची संधी सोडू नका

DRC Systems Share Price

DRC Systems Share Price | डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 26.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह क्लोज झाले आहेत. डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 347.06 कोटी रुपये आहे. ( डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 31.33 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. तसेच या कंपनीने 2022 मध्ये 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजनाची घोषणा केली होती. मात्र, या कंपनीने आतापर्यंत एकदाही लाभांश वाटप केलेला नाही.

मार्च तिमाहीत या कंपनीने 17.12 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 4.80 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या काळात कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 28 टक्के होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनीने 48 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2022-23 मध्ये या कंपनीने 26 कोटी रुपये कमाई केली होती.

2023-24 मध्ये डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनीचा ऑपरेटिंग नफा 15 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर कंपनीचा निव्वळ नफा 12 कोटी रुपये होता. प्रवर्तकांनी या कंपनीचे 22.44 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 76.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः आयटी सल्लागार कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी मोबाइल ॲप डेव्हलपमेंट, वेबसाइट डेव्हलपमेंट, एआय आणि ऑटोमेशन, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, क्लाउड-आधारित सेवा आणि डिजिटल मार्केटिंग सेवांसह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि IT आणि IT-सक्षम सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DRC Systems Share Price NSE Live 14 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

DRC Systems Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony