25 December 2024 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Drone Acharya Aerial Innovations Share Price | मजबूत IPO, या शेअरने दीड महिन्यात 233% परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?

Droneacharya Aerial Innovations Share Price

Drone Acharya Aerial Innovations Share Price | ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पुन्हा वाढली आहे. कंपनीचे शेअर मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून 5 टक्के अप्पर सर्किट हिट करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4.67 टक्के वाढीसह 180.30 रुपयांवर क्लोज झाला होता. तर गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 171.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स 23 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. नंतर स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर पडला. परंतु आता पुन्हा शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली आणि स्टॉक आज पुन्हा 5 टक्के पडला. ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचा IPO 52-54 रुपये प्राइस बँडसाठी जारी करण्यात आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

शेअरची कामगिरी :
‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई एक्सचेंजवर 90 टक्के पेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. स्टॉकची लिस्टिंग किंमत 102 रुपये होती. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर्स अपर सर्किट हिट करून 107.10 रुपये किमतीवर पोहोचले होते. 12 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 243.35 रुपये ही उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. लिस्टिंगनंतर या IPO स्टॉकची किमत 350.65 टक्के वाढली होती. आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 233.89 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

दिग्गज लोकांनी ही पैसे लावले आहेत :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा, चित्रपट अभिनेते आमिर खान, रणबीर कपूर यांनी प्रीआयपीओ टप्प्यात ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीमध्ये पैसे लावले आहेत. 13 डिसेंबर 2022 ते 15 डिसेंबर दरम्यान कंपनीचा IPO सुमारे गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. IPO चा आकार 34 कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता. ‘ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. कंपनीच्या IPO मध्ये रिटेल कोटा 330.82 पट अधिक सबस्क्राइब झाला होता, तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 287.40 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर कंपनीच्या IPO एकूण 243.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Innovations Share Price 543713 stock market live on 16 Feruary 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x