Multibagger IPO | होय! या IPO ने 1 दिवसात पैसे दुप्पट करताच टॉप बॉलीवूड कलाकारांकडून शेअर खरेदीचा सपाटा, डिटेल्स..

Multibagger IPO | काल शेअर बाजारात DroneAcharya Innovations कंपनीच्या IPO ची शानदार लिस्टिंग झाली. शेअर बाजारात जबरदस्त पडझड असताना या कंपनीच्या शेअरची शानदार लिस्टिंग पाहायला मिळाली आहे. या स्टॉक बाबत गमतीची गोष्ट अशी की, ज्यां लोकांनी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्याचे पैसे लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत. BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झालेल्या या ड्रोन स्टार्ट अप कंपनीने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी या ड्रोन स्टार्टअप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पहिल्याच दिवशी 100 टक्के वाढले. यासोबतच बॉलिवूड स्टार आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी ही या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांचाही पैसा IPO लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी दुप्पट झाला आहे.
शेअर होल्डिंग प्रमाण :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी ड्रोन कंपनीचे 4.57 लाख शेअर्स खरेदी केली होते. ब्लॉकबस्टर IPO लिस्टिंगनंतर त्यांच्या 2.45 कोटी रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.89 कोटी रुपये झाले आहे. काल या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर 107.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र लिस्टिंगमध्ये शेअरची किंमत 98.33 टक्के अधिक वाढली होती.
2022 या वर्षाच्या सुरुवातीला प्री आयपीओ भांडवल उभारणीच्या फेरीदरम्यान बॉलिवूड स्टार आमिर खान याने ड्रोन आचार्य कंपनीचे 46,600 शेअर्स 25 लाख रुपयांना खरेदी केले होते. आणि रणबीर कपूरने ही या कंपनीचे 37,200 शेअर्स 20 लाख रुपये मध्ये खरेदी केले होते. IPO पूर्वी गुंतवणुकदारांना 53.59 रुपये प्रति शेअर या किमतीवर शेअर विकण्यात आले होते. IPO लिस्टिंग च्या पहिल्याच दिवशी आज या दोन्ही कलाकारांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.
गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद :
पुणे येथे स्थित असलेल्या या ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी शानदार प्रतिसाद दिला होता. या कंपनीचा आयपीओ ओव्हर सबस्क्राइब झाला होता. अवघ्या तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 262 पट अधिक सबस्क्राईब झाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 330 पेक्षा जास्त सबस्क्राईब झाला होता.
कंपनीचा व्यवसाय थदोक्यात :
DroneAcharya Al ही कंपनी Directorate General of Civil Aviation द्वारे रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन प्रमाणित परवाना मिळवणारी भारतातील पहिली कंपनी आहे. मार्च 2022 पासून आतापर्यंत या कंपनीने 200 पेक्षा जास्त ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहेत. अर्थातच या कंपनीचा IPO मल्टीबॅगर सिद्ध झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| DroneAcharya Innovations companies IPO has got listed on stock market with a premium price on 24 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL