18 November 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Dynacons Share Price | कुबेर पावला राव! फक्त 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर या शेअरने दिला 5.80 कोटी रुपये परतावा

Dynacons Share Price

Dynacons Share Price | डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 668.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत.

डायनाकॉन सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षातर डायनाकॉन्स सिस्टम अँड सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 120 टक्के वाढली. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.037 टक्के वाढीसह 674.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कोरोना काळात, 20 मार्च 2020 रोजी डायनाकॉन सिस्टम्स कंपनीच्या शेअरने 15 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. डायनाकॉन्स सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 4450 टक्के नफा मिळवून दिला आहे. 12 ऑक्टोबर 2001 रोजी हा कंपनीचे शेअर्स 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 12 ऑक्टोबर 2001 रोजी डायनाकॉन सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1,00,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.80 कोटी रुपये झाले असते.

डायनाकॉन्स सिस्टीम कंपनी मुख्यतः तंत्रज्ञान सेवा प्रदान करण्याचे काम करते. मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. अवघ्या 10 वर्षांत डायनाकॉन सिस्टम्स स्टॉकची किंमत 26,000 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील एका वर्षात डायनाकॉन सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 145 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत डायनाकॉन सिस्टम्स कंपनीच्या शेअरची किंमत 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 668 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dynacons Share Price NSE 07 November 2023.

हॅशटॅग्स

Dynacons Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x