16 January 2025 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार?

Dynacons Share Price

Dynacons Share Price | डायनाकॉन सिस्टीम्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1133.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्सने तुफान तेजी नोंदवली आहे. ( डायनाकॉन सिस्टीम्स कंपनी अंश )

डायनाकॉन सिस्टीम्स कंपनीला नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डने कोअर बँकिंग सोल्यूशन अपग्रेडेशन आणि मायग्रेशनसाठी 233 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी डायनाकॉन सिस्टीम्स स्टॉक 10.87 टक्के वाढीसह 1,255 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डायनाकॉन सिस्टीम्स कंपनीला नाबार्डच्या ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर मॉडेलवर काम करणाऱ्या कोअर बँकिंग सिस्टीमला Finacle 7.0 वरून Finacle 10.2.25 मध्ये अपग्रेड करायचे आहे. या कराराच्या व्याप्तीमध्ये आठ राज्यांमधील 38 राज्य सहकारी बँकांच्या 1,391 शाखां सामील आहेत. नवीन फिनाकल प्लॅटफॉर्मचे जास्तीत जास्त फायदे मिळवून बँकिंग कामकाजातील व्यत्यय कमी करणे ही डायनाकॉन कंपनीची प्रमुख जबाबदारी असणार आहे.

मंगळवारी या कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 20 टक्के वाढीसह 929.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 210 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 17.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 4,300 टक्के वाढला आहे. जर तुम्ही 2020 मध्ये डायनाकॉन सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.4 लाखांपेक्षा जास्त झाले असते. मागील एका महिन्यात डायनाकॉन सिस्टीम्स या आयटी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 43.63 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dynacons Share Price NSE Live 18 April 2024.

हॅशटॅग्स

Dynacons Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x