22 November 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

E-Factor Experiences IPO | याला म्हणतात नशीब! IPO शेअरने पहिल्याच दिवशी दिला 53 टक्के परतावा, आता खरेदी करावा का?

E-Factor Experiences IPO

E-Factor Experiences IPO | ई-फॅक्टर एक्सपिरियन्स IPO स्टॉक शेअर बाजारात जबरदस्त किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. या कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 53.33 टक्के प्रीमियम वाढीसह 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर काही वेळातच हा 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 20.75 रुपये किमतीवर पोहचला होता.

ई-फॅक्टर एक्सपिरियन्स आयपीओ 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी ई-फॅक्टर एक्सपिरियन्स स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 126.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ई-फॅक्टर एक्सपिरियन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 71 ते 75 रुपये निश्चित केली होती. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स जारी केले होते. ई-फॅक्टर एक्सपिरियन्स कंपनीच्या IPO चा आकार 25.92 कोटी रुपये होता. आणि या IPO द्वारे कंपनीने 34.56 लाख खुल्या बाजारात जारी केले होते.

या कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान 120000 रुपये जमा करावे लागले होते. रिटेल गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल 2 लॉट खरेदी करू शकत होते. अवघ्या 4 दिवसात या कंपनीचा IPO 80 पट अधिक खरेदी करण्यात आला होता. तर शेवटच्या दिवशी हा IPO 73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

ई-फॅक्टर एक्सपिरियन्स कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून अँकर गुंतवणूकदारांकडून 7.38 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. ई-फॅक्टर एक्सपिरियन्स ही कंपनी मुख्यतः इव्हेंट मॅनेजमेंट संबंधित काम करते. ही कंपनी इव्हेंटमध्ये प्रकाश, ध्वनी आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन करते. ई-फॅक्टर एक्सपिरियन्स कंपनीला सरकारी कार्यक्रमाचे काम मिळत असतात. सध्या ही कंपनी दिल्ली, ओरिसा, जयपूर, नोएडा याठिकाणी काम करत आहे. आणि कंपनीकडे सध्या 32 कर्मचारी आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | E-Factor Experiences IPO 10 October 2023.

हॅशटॅग्स

E-Factor Experiences IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x