12 January 2025 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Easy Trip Planners Share Price | इझी ट्रिप प्लॅनर्स शेअर्स तेजीत, एक बातमी आल्याने स्टॉक तेजीत वाढतोय, फायदा घेणार?

Easy Trip Planners Share Price

Easy Trip Planners Share Price| इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने वर्ल्ड पॅडल लीग 2023 सह भागीदारी केल्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8 टक्के वाढीसह तेजीत धावत होता. सोमवारी हा स्टॉक 8.6 टक्के वाढीसह 46.80 रुपये या उच्चांक किमतीवर पोहोचले होते.

ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने 9 जून 2026 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनी वर्ल्ड पॅडल लीग 2023 मध्ये अधिकृत प्रवास भागीदार म्हणून सामील झाली आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 44.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीमध्ये इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने ऑपरेशन्समधून 60.9 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीचे तुलनेत या कंपनीच्या महसुलात 91.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीच्या एअर सेगमेंट बुकिंगमध्ये तिमाहीत काळात 1.6 पट वाढ नोंदवली गेली आहे. तर हॉटेलच्या नाईट बुकिंगमध्ये 2.2 पट वाढ पाहायला मिळाली आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात EaseMyTrip कंपनीने 26.6 टक्के वाढीसह 134.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने वर्ल्ड पॅडल लीग 2023 सह केलेल्या भागीदारीत प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, EaseMyTrip ही कंपनी संपूर्ण स्पर्धेत स्पॉन्सर करणारी प्रमुख ब्रँडिंग कंपनी असेल. सेबी एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने कळवले आहे की, ही भागीदारी इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीला क्रीडाप्रेमींच्या व्यापक प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध करण्यात मदत करेल.

इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 33.5 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने 31.15 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Easy Trip Planners Share Price today on 13 June 2023.

हॅशटॅग्स

#Easy Trip Planners Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x