21 January 2025 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Penny Stock | बँक देईल इतकं व्याज? या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 34 पट केले, 50,000 रुपयांची गुंतवणूक 17 लाख झाली

Penny Stock

Penny Stock | भारतीय शेअर बाजारात दररोज चढ-उतारांचे चक्र फिरत असून अस्थिरता जाण्याचे काही नाव घेत नाही. सेन्सेक्स निर्देशांक 91.62 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.15 टक्क्यांनी वाढून 61,510.58 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी-50 मध्ये 23.10 अंकांची म्हणजे 0.13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि निर्देशांक 18,267.30 अंकावर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केटमध्ये 1789 शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर 1600 कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. 119 कंपनीचे शेअर्स तटस्थ होते. अपोलो हॉस्पिटल्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी लाइफ, एसबीआय आणि बजाज फायनान्स हे निफ्टीमधील टॉप गेनर स्टॉक होते. तर अदानी एंटरप्रायझेस, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प आणि टेक महिंद्रा कंपनीचे शेअर्स टॉप लुझर स्टॉक होते. या सर्व उलाढालीत एक स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत आला ज्याने कमालीची कामगारी केली आहे. फक्त दीड वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ अधिक तपशील

EKI Energy :
EKI Energy कंपनीचा स्टॉक मागील दीड वर्षांपासून कमलीच्या स्तरावर वाढला आहे. हा स्टॉक 9 एप्रिल 2021 रोजी BSE निर्देशांकावर 40.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होत सध्या हा स्टॉक 1434.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3441.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 34 पट अधिक वाढवले आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये फक्त 50,000 रुपये लावले होते, त्यांची गुंतवणूक आता वाढून 17 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

1 वर्षात दिलेला परतावा :
EKI एनर्जी कंपनीचा स्टॉक मागील एका वर्षात कमालीचा वाढला आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी EKI एनर्जी कंपनीचा स्टॉक बीएसई इंडेक्सवर 1181.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तर सध्या हा स्टॉक 1434.85 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअरने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 21.45 टक्के परतावा कमावून दिला होता.

या कंपनीच्या शेअरने 2022 या वर्षात आतापर्यंत 44.95 टक्के नकारात्मक परतावा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत 24.25 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. स्टॉकने मागील एक महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 16.54 टक्के नकारात्मक परतावा आहे, त्यामुळे लोकाचे नुकसान झाले आहे. मागील 5 दिवसांत स्टॉक 7.14 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

कंपनीची वाटचाल :
सध्या कंपनीचे मार्केट कॅप 3,945.26 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3,149.99 रुपये आहे, तर या स्टॉकची नीचांक किंमत पातळी 1062.51 रुपये होती. आपण पाहू शकतो की हे शेअर्स जसे आपल्याला मजबूत नफा देऊ शकतात, तसे ते आपले पैसे बुडवू ही शकतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
EKI Energy Services Limited ही भारतीय कंपनी जागतिक स्तरावरील आघाडीची ऊर्जा सेवा प्रदाता म्हणून ओळखली जाते. ही कंपनी व्यावसायिक सेवा तसेच हवामान बदल सल्ला आणि कार्बन उत्सर्जन या बाबत उद्योग करते. या कंपनीचा उद्योग विकसित देश जसे की युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, युरोपियन युनियन, जर्मनी, भारत, ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना मुख्यतः कायदे प्रक्रिया, नोंदणी, देखरेख, पडताळणी, पात्र कार्बन क्रेडिट्स जारी करणे आणि पुरवठा तसेच ISO प्रमाणन, JIT/Kaizen वरील व्यवस्थापन प्रशिक्षण आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट यासारख्या सेवा आपल्या प्रदान करण्याचे काम करते. कंपनीने आपला उद्योग विस्तार इतका मोठा केला आहे की, कंपनी आता सरकारी,सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विविध ग्राहकांनाजी सेवा सुविधा पुरवते. EKI एनर्जी कंपनीची सुरुवात 2008 साली झाली होती, आणि कंपनीचे मुख्यालय इंदोर येथे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| EKI Energy Limited Penny Stock has increased and given huge return to shareholders on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x