30 January 2025 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग शेअरने एका वर्षात 204 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, स्टॉक खरेदीला आहे खास

Highlights:

  • Elecon Engineering Share Price
  • एका वर्षात 204 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला
  • शेअरहोल्डिंग पॅटर्न
  • कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये काय?
Elecon Engineering Share Price

Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 20 रुपयेवरून वाढून 594 रुपयेवर गेली आहे. 8 मे 2020 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

एका वर्षात 204 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला

मागील एका वर्षातील इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने लोकांना 204 टक्के मल्टीबॅगर नफा मिळवून दिला आहे. या एका वर्षात शेअरची किंमत 192 रुपयांवरून वाढून 594 रुपयांवर पोहचली होती. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 580.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअरहोल्डिंग पॅटर्न

31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाही आकडेवारीनुसार इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 59.29 टक्के भाग भांडवल धारण केले होते. परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे 2.11 टक्के शेअर्स धारण केले होते. तर म्युच्युअल फंडांनी 0.84 टक्के आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1.72 टक्के भाग भांडवल धारण केले होते. इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1960 साली स्थापन झाले होते. अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इलेकॉन इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 6,274.22 कोटी रुपये आहे.

कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये काय?

इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये ट्रान्समिशन लाइन इक्विपमेंट, मटेरियल होल्डिंग इक्विपमेंट्स, स्क्रॅप, एक्सपोर्ट प्रमोशन यांसारखे साधने सामील आहेत. मार्च 2023 तिमाहीमध्ये इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीने 432.35 कोटी रुपये कमाई केली होती.

मागील तिमाहीमध्ये कंपनीची कमाई 392.32 कोटी रुपये होती. या तिमाहीतील उत्पन्नात 10.20 टक्के वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33.71 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Elecon Engineering Share Price today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

Elecon Engineering Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x