16 April 2025 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Electricity Bills | वीज बिलाचे दर ऐकूण शॉक बसतोय, तर मग या टिप्स फॉलो करा आणि अर्ध वीज बिल कमी भरा

Electricity Bills

Electricity Bills | भारतात महागाईने मोठा उच्चांक गाठला आहे. रोजच्या भाजीपाल्यापासून ते इंधन आणि वीजेचे दर गगणाला भिडले आहे. प्रत्येक व्यक्तीला वीजेची गरज भासते. प्रत्येकाच्या घरात विविध उपकरणे असतात. यात वीज जास्त प्रमाणात खर्च होते. अशात वीज बिल आधीक महागल्याने त्याचे दर ऐकून कुणी वीजेचा शॉक दिलाय की काय असे वाटते.

वाढती महागाई आणि त्यात वाढीव वीज बिल या गोष्टी आपण काही थांबवू किंवा बदलू शकत नाही. मात्र आपल्या दैनंदीन जीवनात आपण योग्य पध्दतीने वीजेचा वापर केला तर याचा फायदा होऊ शकतो. याने तुम्हाला घरात आणि ऑफिसमध्ये येणारे भरमसाठ बिल कमी होण्यास मदत होईल.

ऊर्जा बचत सॉकेट
जर तुम्हाला दिवे किंवा विजेची उपकरणे बंद करण्याचे लक्षात राहत नसेल तर तुम्ही आज ऊर्जा बचत सॉकेट घ्या. यात तुम्ही विसरलात तरी अपोआप तुमच्या विजेचा प्रवाह त्या उपरपणापासून खंडीत केला जातो. यात तुम्हाला एक टाइमर लावणे गरजेचे असते. टाइमर नुसार तुम्ही शेड्यूल सेट केल्यावर वीज वाचवण्यास मदत होते.

एलईडी बल्ब अधीक वापरावेत
एलईडी हा एक सर्वोत्तम प्रकाश असलेला आणि कमी वीज वापरणारा बल्ब आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही जुने बल्ब वापरत असाल तर आजच एलईडी बल्ब आणा. इतर बल्ब खूप जास्त वीज वापरतात. त्यामुळे बचत करुण तुम्ही तुमचा भरमसाठ वीज बिल अटोक्यात आणू शकता. यासह तुमच्या घरातील संगणक तुम्ही वापरत नसल्यास तो बंद करूण ठेवा. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धूवत असाल तर त्या मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे त्यात टाकू नका. तसेच तुमच्या घरात असलेले एअर कंडीश्नर देखील निट वापरा. त्याचे जास्त तापमान किंवा खूप कमी तापमान करू नका. यासह घरातील गिजर देखील योग्य तापमाणावरच वापरा.

गिजर आणि हिटरचा निट वापर करा
आज अनेक सर्वसामान्य व्यक्तींच्या घरात देखील गिजर आणि हिटर आहेत. थंडीचे दिवस सुरू झाले की त्यांचा जास्त वापर केला जातो. गरम पाण्यासाठी अनेक जण याचा हमखास वापर करतात. मात्र ही उपकरणे वापरत असताना काळजी घेतली पाहिजे. तुमची वापर झाल्यावर लगेचच त्याचे बटण बंद केले पाहीजे. तसेच योग्य तापमाणावरच वापरले पाहीजे. ही देन्ही उपकरणे वीजेचा जास्त वापर करतात. त्यामुळे वीज बिल जास्त येते.

सौर पॅनल
आज अनेक गावांमध्ये सौर पॅनल हमखास पहायला मिळते. शहरात जरी याचा वापर जास्त नसला तरी आनेक इमारतींच्या छतांवर सौर पॅनल बसवलेले दिसतात. यात तुम्हाला वीज फ्कात वाचवता येत नाही तर तुमचा वीज बिल निम्म्याहून कमी होतो. सध्या महागाईच्या जगात अनेकांच्या खिशाल सौर पॅनलचा खर्च न परवडणारा आहे. मात्र थोडी काटकसर करुन तुम्ही सौर पॅनल घेतले तर दर महा येणार भरमसाठ वीज बिल लगेच निम्मा होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Electricity Bills worried about the rising electricity bill then follow these tips to reduce the electricity bill 10 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Electricity Bills(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या