22 November 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Emami Share Price | प्रसिद्ध कंपनी प्रचंड नफ्यात, शेअरवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करणार?

Emami Share Price

Emami Share Price | ‘इमामी लिमिटेड’ या भारतीय एफएमसीजी कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांश वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 4 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. मागील एका वर्षात इमामी कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी इमामी कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 416.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Emami Share Price | Emami Stock Price | BSE 531162 | NSE EMAMILTD)

कंपनीचे स्पष्टीकरण :
कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले की, “कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2022-23 आर्थिक वर्षासाठी 4 रुपये प्रति शेअर दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे”. इमामी कंपनीने मागील आठवड्यात स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 13 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल कंपनीने जाहीर केले. कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 219.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो या वर्षी 6 टक्के वाढीसह 233 कोटी रुपयेवर गेला आहे. दरम्यान कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल YOY आधारे 971 कोटींवरून वाढून 982.7 कोटी झाला आहे. कंपनीच्या देशांतर्गत व्यवसाय समीक्षाधीन तिमाहीत 1 टक्के वाढला. इमामी कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवरत्न, बोरोप्लस, फेअर अँड हँडसम, झंडू बाम, मेंथो प्लस, केश किंग, यासारखे प्रसिद्ध ब्रँड सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Emami Share Price 531162 EMAMILTD stock market live on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#Emami Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x