22 February 2025 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Emergency Fund | लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड असेल तर आर्थिक अडचणी आल्या तरी टेन्शन राहणार नाही, इमर्जन्सी फंडबद्दल जाऊन घ्या

Emergency Fund

Emergency Fund | आज आपण इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि त्याचे नियोजन कसे करायचे, हे जाणून घेणार आहोत. आर्थिक अडचणीच्या वाईट काळात आपल्या आर्थिक गरजांचा भार उचलणाऱ्या राखीव रकमेला “आपत्कालीन निधी” म्हणतात. असा आपत्कालीन निधी आपण सर्वांनी तयार करणे आता काळाची गरज बनली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा आपली भविष्याची आर्थिक तरतूद करण्यापूर्वी आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे खूप गरजेचे आहे. केवळ नोकरदार आणि व्यावसायिक लोकांनीच नाही तर प्रत्येक व्यक्तीने काही पैसे आपत्कालीन परस्थितीत खर्च करण्यासाठी राखून ठेवले पाहिजे. हे पैसे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत किंवा गरजेच्या वेळी उपयोगी पडू शकतात.

अचानक घरामध्ये मोठा खर्च आला, कोणाचा आरोग्य उपचार, एखादा अपघात, घर दुरुस्ती किंवा अचानक नोकरी गेली, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तुमच्या कडे आर्थिक पाठिंबा नसेल तर अश्या वेळी आपण पूर्णपणे खचून जाऊ शकतो. यासाठी तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम थांबू नये आणि आर्थिक अडचणीमुळे तुम्हाला पैश्याचे टेन्शन येऊ नये,म्हणून हा आपत्कालीन निधी तयार करणे महत्त्वाचे आहे.

तुम्‍हाला अपेक्षित नसलेला आणि तुमच्‍या मासिक उत्‍पन्‍नापेक्षा कितीतरी अधिक खर्च अचानक उद्भवल्यास, तुम्‍हाला त्याची भरपाई करण्‍यासाठी उसने पैसे घ्यावे लागतील, किंवा कर्ज काढावे लागेल. अश्या अनपेक्षित खर्चामुळे तुमच्यावरील आर्थिक बोजा आणखी वाढेल. तुम्ही पैसे बचत करू शकणार नाही, आणि गुंतवणूकही करू शकणार नाही. त्यामुळे, कोणत्याही आर्थिक बोजाच्या फंदात पडू नका. आणि आपली गुंतवणूक व बचत सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एक आपत्कालीन निधी तयार करण्याचा विचार करा.

इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा ?
एका सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊ की तुम्ही आपत्कालीन निधी कसा तयार करू शकता. समजा तुम्हाला दर महिन्याला ठराविक उत्पन्न किंवा पगार मिळत असेल, तर तुम्ही तुमच्या पगारातून किमान 12 टक्के रक्कम बचत करू शकता,आणि तुमचा आपत्कालीन निधी म्हणून एखाद्या बँक खात्यात किंवा गुंतवणूक योजनेत जमा करू शकता. आपत्कालीन निधीची गणना करण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमच्या मासिक पगारातून मूळ खर्च जसे की घरभाडे, रेशन, भाजीपाला, औषधे आणि इतर बिले यांची यादी करा. आता यात तुमचा एकूण ईएमआय हप्ता इत्यादी मासिक हप्त्याची एकूण रक्कमही जोडा. या दोन खर्चांची बेरीज करा म्हणजे महिन्याचा मूळ खर्च आणि मासिक हप्ता यात किती खर्च होतो हे तुम्हाला कळेल. आता या एकूण खर्चाच्या रकमेचा 12 ने गुणाकार करा, जी रक्कम येईल ती तुमच्या आपत्कालीन निधीची एकूण रक्कम असेल. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुमच्या मूलभूत गरजेव्यतिरिक्त पैसे खर्च करू नका. शिल्लक उरलेले पैसे तुमच्या आपत्कालीन निधीच्या बँक खात्यात जमा करा. एकदा जी का तुमचा 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार झाला,तर तुम्ही इतर गोष्टींमध्ये हमखास गुंतवणूक करू शकता, आणि बिंदास खर्च करू शकता.

आपत्कालीन निधीचे व्यवस्थापन :
आपत्कालीन निधी तयार करताना पैसे अशा ठिकाणी गुंतवणूक करा, जिथे गरजेच्या वेळी तुम्हाला ती रक्कम सहज काढता येईल. तुम्ही तुमचा संपूर्ण आपत्कालीन निधी बँकेत मुदत ठेव योजनेत चांगल्या व्याज दारावर ठेऊ शकता. दुसरा पर्याय असा आहे की, तुम्ही निम्मे पैसे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता, आणि निम्मे पैसे लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवून चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकता. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही हा लिक्विड फंड तोडून पैसे काढू शकता, आणि यावर कोणताही दंड आकारला जात नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Emergency fund benefits need to know check details on 22 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x