22 January 2025 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

EPack Durables IPO | मालामाल करेल हा IPO! GMP नुसार एकदिवसात मिळेल 34 टक्के परतावा

EPack Durables IPO

EPack Durables IPO | शेअर बाजारात सध्या अनेक कंपन्या आपले IPO लाँच करण्याची तयारी करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपले शेअर गुंतवणुकीसाठी खुले देखील केले आहेत. सध्या जर तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करायची असेल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

ई-पॅक ड्युरेबल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेश स्थित वातानुकूलित यंत्रणा बनवणाऱ्या ई-पॅक ड्युरेबल कंपनीने आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला केला आहे. या कंपनीचा IPO 19 जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.

ई-पॅक ड्युरेबल ही कंपनी मुख्यतः रूम एअर कंडिशनर्स आणि स्मॉल डोमेस्टिक अप्लायन्सेस, हीट एक्सचेंजर्स, क्रॉस-फ्लो पंखे, अक्षीय पंखे बनवण्याचा व्यवसाय करते. सध्या ई-पॅक ड्युरेबल ही कंपनी इंडक्शन कुकटॉप्स, मिक्सरग्राइंडर आणि वॉटर डिस्पेंसर यांसारखे लहान घरगुती उपकरणे देखील बनवण्याचा व्यवसाय करते. ई-पॅक ड्युरेबल कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 218-230 रुपये निश्चित केली आहे.

एका लॉटमध्ये कंपनीने 65 शेअर्स ठवेले आहेत. IPO द्वारे ही कंपनी 640 कोटी रुपये भांडवल उभारणार आहे. या IPO मध्ये कंपनीने 240 कोटी रुपये मूल्याचे 10,437,047 शेअर्स ऑफर-फॉर-सेल अंतर्गत जारी केले आहेत. तर 400 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी केले आहेत.

ई-पॅक ड्युरेबल कंपनीच्या IPO मध्ये प्रवर्तकांनी आपले शेअर्स विकायला काढले आहे. IPO सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनीतील प्रवर्तकांचा वाटा 65.36 टक्केवरून कमी होऊन 48.09 टक्के होईल. याशिवाय इंडिया अॅडव्हांटेज फंड आणि डायनॅमिक इंडिया फंड देखील ऑफर-फॉर-सेल अंतर्गत आपले ई-पॅक ड्युरेबल कंपनीतील स्टेक खुल्या बाजारात विकणार आहेत. IPO सूचीबद्ध झाल्यानंतर ई-पॅक ड्युरेबल कंपनीतील इंडिया अॅडव्हांटेज फंडचा हिस्सा 18.52 टक्के कमी होऊन 10.33 टक्के होईल. तर डायनॅमिक इंडिया फंडचा हिस्सा 1.61 टक्केवरून कमी होऊन 0.66 टक्के होईल.

या IPO ऑफरमध्ये ई-पॅक ड्युरेबल कंपनीने पात्र संस्थात्मक बोलीदारांसाठी 50 टक्के वाटा राखीव ठेवला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी कंपनीने 15 टक्के वाटा राखीव ठेवला आहे. उर्वरित 35 टक्के वाटा कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

ई-पॅक ड्युरेबल ही कंपनी आपल्या IPO मधून जमा होणाऱ्या रक्कमेपैकी 230 कोटी रुपये कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी आणि नवीन सुविधा केंद्र उभारण्यासाठी खर्च करणार आहे. यासह ई-पॅक ड्युरेबल कंपनी कर्ज फेडण्यासाठी 80 कोटी रुपये खर्च करणार आहे. आणि उर्वरित निधी कंपनी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्च करेल. ई-पॅक ड्युरेबल कंपनीच्या या IPO इश्यूमध्ये अॅक्सिस कॅपिटल, डॅम कॅपिटल अॅडव्हायझर्स, IFDC सिक्युरिटीज आणि ICICI सिक्युरिटीज हे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत. तर Kfin Technologies ही कंपनी IPO रजिस्ट्रार म्हणून जबाबदारी पार पडणार आहे.

या कंपनीचे IPO शेअर्स BSE NSE या दोन्ही एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील. IPO शेअर्सचे वाटप 24 जानेवारी 2024 रोजी केले जातील आणि 29 जानेवारी 2024 रोजी शेअर सूचीबद्ध केला जाईल. ग्रे मार्केटमध्ये ई-पॅक ड्युरेबल कंपनीचा IPO स्टॉक 34 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EPack Durables IPO GMP Today on 22 January 2024.

हॅशटॅग्स

EPack Durables IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x