17 April 2025 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

EPF Account UAN Retrieve Online | EPF अकाऊंटचा UAN नंबर विसरलात? | पुन्हा असा ऑनलाईन मिळवा

EPF Account UAN Retrieve Online

मुंबई , ०४ ऑक्टोबर | प्रत्येक नोकरदारासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF खाते हा जिव्हाळ्याचा विषय असतो. बहुतांश नोकरदारांसाठी प्रोव्हिडंट फंडाची रक्कम ही उतारवयातील आधार असते. त्यामुळे नोकरदार पीएफ खात्याबाबत अत्यंत दक्ष असतात. तुमच्या पीएफ खात्यासाठी EPFO कडून 12 अंकाचा यूएएन क्रमांक दिला (EPF Account UAN Retrieve Online) जातो. हा क्रमांक वापरुन तुम्ही वेळोवेळी पीएफ खात्यामधील रक्कम तपासू शकता.

EPF Account UAN Retrieve Online. However, sometimes there is a risk of missing documents and other information. If you lose your UAN number then you can get it back online :

नोकरी बदलताना किंवा पीएफची रक्कम काढताना यूएएन क्रमांक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र, काहीवेळा कागदपत्रे आणि इतर माहिती गहाळ होण्याचा धोका असतो. अशावेळी तुमचा UAN नंबर गहाळ झाल्यास तुम्ही तो ऑनलाईन परत मिळवू शकता.

UAN नंबर परत कसा मिळवाल?
१. सर्वप्रथम ईपीएफओच्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in या पोर्टलवर लॉग इन करा.
२. संकेतस्थळावर आल्यानंतर Know You UAN या पर्यायावर क्लिक करा.
३. यानंतर स्क्रीनवर तुमचा रजिस्टर्ड 10 अंकी मोबाईल नंबर टाका. बॉक्समध्ये असलेला कॅप्चा कोड भरा.
४. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर पडताळणीसाठी एक ओटीपी येईल.
५. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोरच्या स्क्रीनमध्ये नाव, जन्मतारीख असा वैयक्तिक तपशील भरण्यासाठी सांगितला जाईल.
६. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुमचा आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक विचारला जाईल.
७. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर Show My UAN असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला UAN क्रमांक मिळेल.

SMS’द्वारे UAN कार्यरत कसा करायचा?
ईपीएफओकडे नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक नोंदणी केलेला असतो. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN हा संदेश पाठवावा लागेल. तुम्ही मेसेज पाठवला की लगेचच तुम्हाला ईपीएफओकडून तुमच्या खात्याविषयी मेसेज येईल. यामध्ये पीएफ खात्यातील रक्कम,अखेरचे पैसे जमा केलेली तारीख इत्यादी माहिती मिळेल.

EPFO पोर्टलवरुन UAN अ‌ॅक्टिव्हेट कसा करायचा?
जर तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात तिथे तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या सॅलरील स्लीपवर देखील युएएन क्रमाक लिहिलेला असतो. ईपीएफओ पोर्टलवरुन UAN अ‌ॅक्टिव्हेट करण्यासाठी खालील स्टेप वापरा.

1: सर्व प्रथम EPFO च्या वेबसाईटवर Services मेनूमध्ये For Employee या ऑप्शन वर क्लिक करा
2: यानंतर Services पेज वर दिसणाऱ्या Member UAN/Online Service ऑप्शन वर क्लिक करा.
3: यानंतर नवीन पेज खुलं होईल, तिथे दिसणाऱ्या अ‌ॅक्टिवेट यूनिवर्सल अकाउँट नंबर (UAN) या ऑप्शन वर क्लिक करा.
4: इथं तुम्हाला UAN नंबर, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि कॅप्चा टेक्स्ट भरा, यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा
5: यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर एक OTP येईल. यानंतर डिटेल्स वेरीफाई करा. यानंतर I Agree वर क्लिक करा. यानंतर UAN अ‌ॅक्टिव्हेट करा.
6:UAN नंबर अ‌ॅक्टिव्हेट होण्यासाठी सहा तासांचा वेळ लागतो. यांनतर तुम्ही PF अकाऊंटशी काम करु शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: EPF Account UAN Retrieve Online process in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या