EPF Money | तुमचा ईपीएफ'मधील अधिक पैसा शेअर बाजारात गुंतवला जाणार, नेमका काय परिणाम होणार जाणून घ्या
EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आता शेअर बाजारात मोठी पैज लावण्याच्या तयारीत आहे. शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे वाढवण्याचा ईपीएफओचा मानस आहे. सध्या ‘ईपीएफओ’ची इक्विटी बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा १५ टक्के आहे. ती २० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून (सीबीटी) २९ आणि ३० जून रोजी होणाऱ्या बैठकीत इक्विटीतील हिस्सा वाढवण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता असून, या बैठकीत त्याला मंजुरीही मिळू शकते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
शेअर्समधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याच्या प्रस्ताव :
एनडीटीव्हीने पीटीआयच्या हवाल्याने म्हटले आहे की, शेअर्समधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला ईपीएफओची सल्लागार संस्था आणि वित्त लेखापरीक्षण आणि गुंतवणूक समितीने (एफएआयसी) यापूर्वीच मान्यता दिली आहे. आता फईकच्या शिफारशी केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहेत. ईपीएफओचे सध्या सुमारे ५ कोटी ग्राहक आहेत. सध्या ईपीएफओ काही एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफ) सुमारे 1,800-2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करते.
एफएआयसी’ने शेअरमध्ये वाढ करण्याची शिफारस केली आहे :
सोमवारी लोकसभेत लेखी उत्तर देताना कामगार व रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी) उपसमिती वित्त लेखापरीक्षण व गुंतवणूक समितीने (एफएआयसी) गुंतवणूक श्रेणी चारमधील इक्विटी गुंतवणूक ५-१५ टक्क्यांवरून ५-२० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. ईपीएफओने ऑगस्ट २०२१ पासून एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती आणि ईटीएफमध्ये आपल्या एकूण गुंतवणूकयोग्य निधीपैकी केवळ ५ टक्के गुंतवणूक केली होती. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात ईपीएफओची ईटीएफमधील गुंतवणूक 15 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
कमी व्याजदराने ईपीएफ सदस्यांमध्ये नाराजी :
ईपीएफवर सध्याचा ८.१ टक्के व्याजदर हा १९७७-७८ नंतरचा सर्वात कमी व्याजदर आहे. सध्या ईपीएफओ 4 दशकातील सर्वात कमी व्याज देत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी 8.1 टक्के व्याजदराला मंजुरी देण्यात आली. ईपीएफओला शेअर्समध्ये गुंतवणूक करून डेट सिक्युरिटीजमधून मिळणाऱ्या कमी रिटर्नची भरपाई करायची आहे.
म्युच्युअल फंड व्यवस्थापकांचीही भेट घेतली :
मणिकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ईपीएफओला दररोज सुमारे 600 कोटी रुपये मिळतात. यातील २०० कोटी रुपये दावे निकाली काढण्यासाठी खर्च केले जातात. इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या शक्यतांचे मूल्यांकन करण्यासाठी ईपीएफओच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी म्युच्युअल फंड व्यवस्थापकांचीही भेट घेतली होती.
नुकसान झाल्यास फटका ईपीएफ सदस्यांना :
शेअर बाजारातील कोणतीही गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. परिणामी भविष्यात कोणत्याही नुकसानास ईपीएफ सदस्यांना त्याचा थेट फटका बसेल. तर दुसरीकडे याबाबत ईपीएफओ आपल्या सदस्यांकडून एखादं डिस्क्लेमर सुद्धा लिहून घेऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. तसेच नफा झाल्यास तो ईपीएफ सदस्यांसोबत सरकार शेअर करेल का याची देखील कोणतीही हमी मिळणार का याची देखील शक्यता कमीच असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: EPF Money EPFO likely to enhance investment ratio limit in equities up to 20 percent check details 19 July 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL