14 January 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

EPFO Alert For Account Holders | तुमचं EPF अकाउंट आहे? | मग ही बातमी वाचा

EPFO Alert For Account Holders

मुंबई, 10 ऑक्टोबर | जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ (EPFO Alert For Account Holders) खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.

EPFO Alert For Account Holders. EPFO never asks it’s members to share their personal details like Aadhaar, PAN, UAN, Bank Account or OTP over phone or on social media. Stay alert & beware of fraudsters :

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या पीएफ निधीची रक्कम सर्वात महत्वाची असते. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.

ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, “ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही.

अशा परिस्थितीत, ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून नेहमी सतर्क रहा. यासोबतच ईपीएफओने बनावट वेबसाईट टाळण्याचा सल्लाही दिला आहे. जर तुम्ही ईपीएफओच्या अलर्टकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: EPFO Alert For Account Holders not to share their personal details over phone or on social media.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x