29 September 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, पुन्हा कमाई होणार, 1 वर्षात दिला 1719% परतावा - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ब्रेकआउट देणार, स्टॉक रेटिंग 'अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Axis Mutual Fund | बँक FD नव्हे, या म्युच्युअल फंड योजना वर्षाला 30 ते 40 टक्के परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शॉर्ट टर्ममध्ये होईल 25 टक्के कमाई - Marathi News BHEL Share Price | BHEL आणि टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या योजना 4 ते 5 पटीने पैसा वाढवतील, यादी सेव्ह करून ठेवा - Marathi News NBCC Share Price | NBCC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मागील 4 वर्षांत 591% परतावा दिला - Marathi News
x

EPFO Passbook | सरकार लवकरच वाढवणार 21 हजारापर्यंत पगाराची मर्यादा, निवृत्तीनंतर व्हाल 1 कोटींचे मालक - Marathi News

Highlights:

  • EPFO Passbook
  • कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही करतात योगदान :
  • लवकरच होणार 21,000 हजारापर्यंत वेतन मर्यादा :
  • 35 वर्षांच्या योगदानाचे कॅल्क्युलेशन :
  • मर्यादेमध्ये बदल :
EPFO Passbook

EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये म्हणजेच ईपीएफओ आणि ईपीएसमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. असं झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर एक कोटी रुपये मिळू शकतात. याबाबत केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत काही संकेत दिले आहेत.

कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही करतात योगदान :
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार प्रत्येक महिन्याला 15,000 हजार रुपयांइतका असेल तर, कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही मिळून ईपीएफओ सदस्याच्या खात्यामध्ये योगदान करतात. हे योगदान दोन भागांमध्ये विभागले गेले असून 8.33% रक्कम पेन्शन योजनेत म्हणजेच ईपीएसमध्ये तर, 3.67% रक्कम ईपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला जातो.

याचाच अर्थ कर्मचाऱ्याला जर 15,000 रुपये पगार असेल तर, भविष्य निर्वाह निधीमध्ये 1,800 रूपये जातील आणि 550.50 रूपये नियोक्ताकडून भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान केले जाईल. त्याचबरोबर पेन्शन योजनेमध्ये एकूण रक्कम 1,249.50 रुपये जमा होतील.

लवकरच होणार 21,000 हजारापर्यंत वेतन मर्यादा :
21,000 रुपयांच्या योगदानाचा प्रस्ताव मंजूर झाल्याबरोबर कर्मचाऱ्याचे एकूण योगदान 2,520 रुपये असेल आणि नियोक्तकडून होणारे योगदान 770.70 रुपये तर, ईपीएस खात्यात 1,749.30 रुपये जमा होतील.

35 वर्षांच्या योगदानाचे कॅल्क्युलेशन :
समजा पगाराची मर्यादा 21,000 रुपये केली तर, एकूण 35 वर्ष योगदान देणारा 23 वर्षीय कर्मचारी तब्बल 1 कोटींच्या निधीपर्यंत अगदी आरामात पोहोचू शकतो. सध्याच्या 15,000 च्या मर्यादेवर 71.55 लाख एवढी रक्कम येते. यामधील एकूण योगदानाची रक्कम 10.71 लाख तर, व्याजाचे 60.84 लाख रुपये होतात. त्याचप्रमाणे 21,000 च्या पगारावर एकूण योगदान 15 लाख आणि व्याजाची रक्कम 85 लाख असेल. या कारणामुळे तुम्हाला जास्तीचे 28.45 लाख मिळतात.

मर्यादेमध्ये बदल :
ईपीएफओने पैसे काढण्याची मर्यादा बदलली आहे. आधी तुम्ही 50,000 पर्यंत रक्कम काढू शकत होता. परंतु आता ही मर्यादा वाढवून तुम्ही कौटुंबिक आणि आपातकालीन परिस्थितीमध्ये 1 लाख रुपये रक्कम काढू शकता.

Latest Marathi News | EPFO Passbook salary limit 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x