22 November 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

EPFO Pension Money | तुमच्या कुटुंबातील पेन्शनर्स आता वर्षभरात कधीही ऑनलाईन सादर करू शकता लाईफ सर्टिफिकेट, पहा कसे?

EPFO Pension Money

EPFO Pension Money | कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच पेन्शनधारकांबाबत ट्विट केले आहे. ईपीएफओने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ईपीएस 95 पेन्शनर आता कधीही लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात जे सबमिट केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध असतील. पेन्शनधारकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे कारण या आधी त्यांना ठराविक काळासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, अन्यथा पेन्शन बंद होण्याची शक्यता होती.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट :
पेन्शनरांचा विचार करून ईपीएफओने पेन्शनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी पेन्शनरांना बँक किंवा पेन्शन एजन्सीकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपण ते कोठूनही ऑनलाइन सबमिट करू शकता. तुम्ही लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन किंवा ऑफलाइन सबमिट करत असाल, तर ते दोन्ही प्रकारे वैध मानलं जातं.

DLC कसे सबमिट करावे :
पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालये आणि जिल्हा कार्यालयांमध्ये डिजिटल पद्धतीने सादर करता येते, याशिवाय पेन्शन वितरण बँक शाखा आणि जवळच्या टपाल कार्यालयांमध्येही ते सहज सादर करू शकतात. याशिवाय उमंग अॅपच्या माध्यमातून आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्सवरही डीएलसी सादर करता येणार आहे. जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्यासाठी पेन्शनधारकाकडे पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील, आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

घरपोच सेवा सुविधा :
पेन्शनर स्वतःहून यासाठी जाऊ शकत नसतील, तर त्यांच्यासाठी घरपोच सेवेचीही सोय आहे. पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये घरपोच सेवेची सुविधा उपलब्ध असेल. यामध्ये पोस्टमन किंवा बँक कर्मचारी पेन्शनधारकाच्या घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करतो. पण या सुविधेसाठी आधीच अर्ज करावा लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EPFO Pension Money life certificate online submission check process 01 September 2022.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Money(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x