5 November 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

EPFO Pension | किमान पेन्शन नऊ पट वाढू शकते | आता तुम्हाला दरमहा 9000 रुपये मिळतील | सविस्तर माहिती

EPFO Pension

मुंबई, 15 मार्च | EPFO च्या पेन्शन योजनेच्या (EPS) ग्राहकांना सरकार एक मोठी भेट देणार असल्याचं वृत्त होतं. त्यानुसार आता या योजनेत उपलब्ध किमान पेन्शन 9 पट वाढवण्याची तयारी सुरू आहे. असे झाल्यास, आता ईपीएसशी संबंधित (EPFO Pension) लोकांना 1-1 हजारांऐवजी 9-9 हजार रुपये दरमहा मिळू शकतात.

Now preparations are on to increase the minimum pension available in this scheme by 9 times. If this happens, now people associated with EPS can get 9-9 thousand rupees every month :

वृत्तानुसार, कामगार मंत्रालय फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय अपेक्षित होता. त्या बैठकीत नव्या वेतन संहितेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली आली होती. कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत किमान पेन्शन वाढवणे हा या महत्त्वाच्या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु पूर्ण माहिती आणि निर्णय समोर आलेला नाही.

किमान निवृत्ती वेतनात वाढ करावी, अशी निवृत्ती वेतनधारकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. यासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या यापूर्वीही झाल्या आहेत. संसदेच्या स्थायी समितीनेही यासंदर्भात सूचना केल्या आहेत. समितीच्या शिफारशींच्या आधारे किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

संसदेच्या स्थायी समितीने मार्च 2021 मध्ये याबाबत सूचना केली होती. किमान पेन्शनची रक्कम सध्याच्या एक हजारावरून तीन हजारांवर नेण्यात यावी, असे समितीने म्हटले होते. मात्र, ती वाढवून नऊ हजार करण्यात यावी, असे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे. असे झाले तरच EPS-95 शी संबंधित निवृत्ती वेतनधारकांना खर्‍या अर्थाने लाभ मिळू शकेल.

संबंधित व्यक्तीच्या शेवटच्या पगारातून किमान पेन्शन ठरवावी, अशीही सूचना आहे. निवृत्तीच्या अगदी आधी कर्मचाऱ्याला मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या आधारे किमान निवृत्ती वेतन निश्चित केले जावे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कामगार मंत्रालयाच्या बैठकीतही या सूचनेचा विचार केला जाऊ शकतो असं सांगण्यात आले होते. त्यामुळे असा निर्णय अपेक्षित आहे आणि तसे झाल्यास कामगारांना प्रचंड फायदा होऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EPFO Pension new wage code labour ministry minimum pension meeting decision soon.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x