17 April 2025 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL
x

ESAF Small Finance Bank IPO | आला रे आला IPO आला! प्राईस बँड 57 रुपये, पहिल्याच दिवशी कमीतकमी 33% परतावा मिळेल

ESAF Small Finance Bank IPO

ESAF Small Finance Bank IPO | ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी या बँकेच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशीच पूर्ण सबस्क्राईब झाला होता. ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा IPO पहिल्याच दिवशी 1.81 पट सबस्क्राइब झाला होता.

या स्मॉल फायनान्स बँकेचे आयपीओ शेअर्स ग्रे मार्केटमध्ये देखील कमालीची कामगिरी करत आहेत. तज्ञांच्या मते ESAF स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 33 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमधील किंमत विचारात घेतली तर, या बँकेचे IPO शेअर्स 80 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 57-60 रुपये निश्चित केली आहे. या स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर ESAF स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 60 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले तर, गेले , तर हा स्टॉक 80 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 33 टक्के नफा मिळू शकतो. ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO चा आकार 463 कोटी रुपये आहे.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचे IPO शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. हा बँकेच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 2.06 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 2.53 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 0.95 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर बँकेच्या कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा 1.06 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. 16 नोव्हेंबर 2023 या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होतील. किरकोळ गुंतवणूकदार या बँकेच्या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉटसाठी खरेदी करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ESAF Small Finance Bank IPO 04 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

ESAF Small Finance Bank IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या