19 February 2025 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन वाढत नाहीत, अशा फंडात वाढतात, 1 लाख रुपयांवर मिळेल 1.74 कोटी रुपये परतावा Post Office Scheme | स्वस्तात मस्त, फक्त 70 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीला 3 लाख रुपये मिळतील, योजनेचा फायदा घ्या 8th Pay Commission | नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात होणार इतकी वाढ, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | गुरुवार 20 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा गुरुवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Ration Card Alert | रेशन कार्ड वापरणाऱ्या सर्व सदस्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक, नियम न पाळल्यास रेशन कार्ड होणार बंद Vedanta Share Price | वेदांता स्टॉकबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर तेजीत, हा मल्टिबॅगर शेअर डेंजर झोनच्या बाहेर आला का? - NSE: IRFC
x

Faze Three Share Price | फेज थ्री शेअर्सच्या गुंतवणूकदारांची 5,700 टक्के परताव्याची कमाई, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा

Faze Three Share Price

Faze Three Share Price | भारतीय शेअर बाजार हा अनेक कंपन्यांच्या शेअरचा महासागर आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी मागील 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, फेज थ्री लिमिटेड. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Faze Three Share)

या कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5,700 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 398.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (NSE Share Price Faze Three Ltd)

गुंतवणुकीवर परतावा (Faze Three Ltd Share Price)

मागील पाच वर्षांत फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढले आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी फेज थ्री लिमिटेड स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6 लाख रुपये झाले असते.

फेज थ्री लिमिटेड ही कंपनी मुख्यतः घरातील इंटिरियर उत्पादने बनवण्याचे आणि निर्यात करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने बेडस्प्रेड्स, डेकोरेटिव्ह कुशन, टेबलटॉप्स, रग्ज, थ्रो, स्कॅटर रग्ज, बाथमॅट्स आणि टफ्टेड कार्पेट्स, यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे.

कंपनीचा अल्पपरिचय

फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी एकूण भाग भांडवलपैकी 56.16 टक्के वाटा धारण केला.आहे. तर उर्वरित 43.84 टक्के भाग भांडवल सार्वजनिक भागधारकांनी धारण केले आहे. शेअर बाजारातील.दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील मार्च 2023 तिमाहीपर्यंत फेज थ्री लिमिटेड कंपनीचे 5.23 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

आज या कंपनीचे शेअर 400 रुपयेच्या ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 400 रुपये किंमत सहज ओलांडू शकतो. अरिहंत कॅपिटलच्या तज्ञांनी फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर 436-475 रुपयये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Faze Three Share Price today on 26 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Faze Three Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x