Stock To Buy | अल्पावधीत 25 टक्के परतावा हवा आहे का? फिनोलेक्स केबल्स शेअर देईल पैसा, टार्गेट प्राईस पहा
Stock To Buy | फिनोलेक्स केबल्स या वायर केबल, एलईडी लाईट, फॅन, स्विच, ऑप्टिकल फायबर, वॉटर हीटर यासारखे वस्तू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरबाबत ग्लोबल ब्रोकरेज उत्साही पाहायला मिळत आहे. जेफरीज फर्मने देखील फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या स्टॉकवर जाहीर केलेली लक्ष्य किंमत 25 टक्के अधिक वाढवली आहे.
फिनोलेक्स केबल्स कंपनीने जून 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केल्याने तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने कंपनीबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे.
टार्गेट प्राईस
Jefferies फर्मने फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग दिली होती. यापूर्वी तज्ञांनी स्टॉकवर 1025 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. आता त्यात 25 टक्क्यांची वाढ करून नवीन लक्ष किंमत 1270 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2024-2026 या कालावधीसाठी फिनोलेक्स केबल्स कंपनीचा EPS दर 7-8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2023-2026 मध्ये कंपनीच्या विक्री/निव्वळ नफ्याची CAGR वाढ अनुक्रमें 19 टक्के /22 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच ROCE मध्ये देखील 500 अंकांची वाढ होण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या इलेक्ट्रिकल केबल सेगमेंट व्हॉल्यूममध्ये 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात इलेक्ट्रिकल केबल विभागाचे मार्जिन 13 टक्के आहे. आणि वायर क्षेत्रात या कंपनीने बाजारातील 22 टक्के हिस्सा काबीज केला आहे. फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या एकूण महसुलातून 82.20 टक्के महसूल इलेक्ट्रिकल केबल्समधून येतो.
कम्युनिकेशन केबल्समधून कंपनी सुमारे 13 टक्के महसूल संकलित करते. कंपनीच्या इतर उत्पादनांमधून संकलित होणारा महसूल 4.4 टक्के आहे. जून 2023 तिमाहीत कंपनीच्या इलेक्ट्रिकल केबल विभागातून कंपनीने 22 टक्के महसूल संकलित केला होता. आणि कम्युनिकेशन केबल सेगमेंटमधून कंपनीने 17 टक्के महसूल संकलित केला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये फिनोलेक्स केबल्स कंपनीने 19 टक्क्यांच्या वाढीसह 1204 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जून तिमाहीत कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात म्हणजेच EBITDA मध्ये 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणि कंपनीने 183 कोटी रुपये ऑपरेटींग नफा कमावला आहे. जून तिमाहीत फिनोलेक्स केबल्स कंपनीने 39 टक्क्यांच्या वाढीसह 132 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील एका महिन्यात फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या शेअरची किंमत 19 टक्के वाढली आहे. तर मागील तीन महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत 20 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात शेअरची किंमत 95 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 126 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील तीन वर्षांत कंपनीच्या शेअरने लोकांना 275 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Finolex cable Stock To Buy for investment on 19 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH