20 January 2025 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
x

राज्यातील कीर्तनकारांना बाप्पा पावला | कोरोना काळात राज्य सरकार महिन्याला 5 हजार रुपये मानधन देणार

Kirtankar

मुंबई, ०९ सप्टेंबर | उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील कीर्तनकारांना बाप्पा पावला, राज्य सरकार महिन्याला 5 हजार रुपये मानधन देणार – Five thousand rupees will be given to Kirtankars during corona period decision of state government :

राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात सुखद बातमी:
कोरोनाकाळात कीर्तने, प्रवचने बंद असल्याने छोट्या मोठ्या कीर्तनकार, प्रवचनकार यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली तर काही जणांना उपासमारीला देखील सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यात कीर्तनकार-प्रवचनकार दुसरं कोणतं कामंही करु शकत नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदतीची गरज होती. अखेर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत.

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार , प्रवचनकार , गायक, वादक, यांना प्रत्येकी 5 हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहे. यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा स्त्युत्य निर्णय घेण्यात आला.

कीर्तनकारांना दिलासा:
सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आणि योग्य आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळालेला आहे.राज्यभरात असे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक आहेत, ज्यांची कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. पण सरकारच्या निर्णयाने त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळालेला आहे, अशी प्रतिक्रिया वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Five thousand rupees will be given to Kirtankars during corona period decision of state government.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x