19 November 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या
x

Flipkart Online Shopping | फ्लिपकार्टच्या ग्राहकांना मोठा धक्का, खरेदी नंतर हा पर्याय निवडल्यास होईल नुकसान

Flipkart Online Shopping

Flipkart Online Shopping | बाजारातून वस्तू खरेदी करताना अनेक अडचणी येतात. अशात ग्राहकांना अधीक सुलभतेने खरेदी करता यावी यासाठी ई-कॉमर्स सेवा सुरु करण्यात आली. यात वस्तू खरेदीसाठी बाजारात न जाता ती घरापर्यंत पोहचू लागली. अलीकडेच अशा पध्दतिने वस्तू खरेदी करण्यास अनेक ग्राहक पसंती दाखवत आहेत. कारण ई-कॉमर्सवर विविध सुट आणि आकर्शक डिस्काउंट दिला जातो. त्यामुळे वेळेची बचत करत सर्वचजण यावर खरेदी करतात. सुरुवातीला ऍमेझॉन ही कंपनी जास्त लोकप्रीय होती त्यानंतर फ्लीपकार्ड आणि अशा अनेक कंपन्या विकसीत झाल्या. यात तुम्हाला कॅश ऑन डिलीव्हरी पर्याय असल्याने अनेकांचा कल ऑनलाईन शॉपींगसाठी अधीक वाढला आहे.

मात्र आता तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण यात तुमचे अतीरिक्त पैसे जाऊ शकतात. फ्लिपकर्टवर शॉपींगसाठी सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत. यात रोजच्या वारपाच्या वस्तू, दागिने, कपडे असे सर्व काही मिळते. तसेच या सर्वांवर मोठा डिस्काउंट आणि कॅशबॅक देखील मिळतो. मात्र आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. आजवर कॅश ऑन डिलीव्हरीसाठी कोणतेही अतीरीक्त दर आकारले जात नव्हते मात्र आता यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत.

आजवर खरेदी केल्यावर पेमेंटसाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, कॅश ऑन डिलीव्हरी हे पर्याय येत होते. त्यामुळे सर्वच जण सहसा कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय निवडत होते. परंतू तुम्ही आता हा पर्याय निवडला तर तुमचे खरेदी केलेल्या वस्तूवरचे बिल अजून वाढणार आहे. त्यामुळे ही बाब फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी मोठा झटका देणारी आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही ५०० रुपयांच्या आत खरेदी केली असल्यास त्यावर ४० रुपये डिलीव्हरी चार्ज आकारला जात होता. ५०० वर खरेदी असेल तर कोणताही अतीरिक्त चार्ज लावला जात नव्हता.

फ्लिपकार्ट कंपनीने स्वत: त्यांच्या अधिकृत साइटवरुन ही माहिती दिली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडावा आणि कॅश ऑन डिलीव्हरी कमी व्हाव्या यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्टवर खरेदी केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट न केल्यास तुमच्या प्रत्येक वस्तूवर ५ रुपये जास्तीचे आकारले जातील. हे पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला ऑनलाइन पेमेंटमधील डेबिट कार्ड, यूपीआय असे पर्याय निवडावे लागतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Flipkart Online Shopping If you choose this option after buying from Flipkart it will be a loss 01 November 2022.

हॅशटॅग्स

Flipkart Online Shopping(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x