17 April 2025 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Fluidomat Share Price | पैशाचा पाऊस! फ्लुइडोमॅट शेअरने अल्पावधीत दिला 500 टक्के परतावा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?

Fluidomat Share Price

Fluidomat Share Price | फ्लुइडोमॅट लिमिटेड कंपनीचे शेअर मागील काही दिवसापासून मजबूत तेजीत वाढत आहेत. आज देखील फ्लूडोमॅट लिमिटेड कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 350 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 दिवसात फ्लुइडोमॅट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 14.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत फ्लुइडोमॅट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 64.42 टक्के वाढवले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 129.69 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी फ्लुइडोमॅट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 360.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

30 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 64 रुपये या नीचांक किमतीवर पोहोचले होते. तर या किंमत पातळीवरून, फ्लुइडोमॅट कंपनीचे शेअर्स आता 500 टक्के वाढले आहे. फ्लुडोमेट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 380 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 145 रुपये होती.

फ्लुइडोमॅट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 173 कोटी रुपये आहे. मागील काही दिवसांपासून फ्लुइडोमॅट कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे, कारण कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत फ्लुडोमेट लिमिटेड कंपनीने 29 टक्के वाढीसह 14 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचा कार्यरत नफा 4.62 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर याच तिमाहीत कंपनीने वार्षिक आधारावर 86 टक्क्यांच्या वाढीसह 3.31 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.

फ्लुइडोमॅट ही कंपनी मुख्यतः अॅप्लिकेशन अभियांत्रिकी कौशल्य, ड्राइव्ह सोल्यूशन्स आणि ऊर्जा बचत सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी अॅप्लिकेशन इंजिनीअरिंग व्यवसायात भारतात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. फ्लुइडोमॅट ही कंपनी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील ग्राहक उद्योगांना कपलिंगचा पुरवठा करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fluidomat Share Price NSE 12 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Fluidomat Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या