6 January 2025 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Focus Lighting Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 2 वर्षात 800% परतावा देणारा फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर स्टॉक स्प्लिट होणार, फायदा घेणार?

Focus Lighting Share Price

Focus Lighting Share Price | फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत असण्याचे कारण म्हणजे, फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स 1:5 या प्रमाणात विभाजित करण्याची घोषणा केली आहे.

यासाठी फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 6 ऑक्टोबर 2023 हा दिवस जाहीर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर स्टॉक 4.04 टक्के वाढीसह 783.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 507 रुपयेवरून वाढून 780 च्या पार गेली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 315 रुपयेवरून वाढून 780 रुपयेच्या पार गेले आहेत. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 140 टक्के नफा मिळाला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 150 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी अवघ्या एका वर्षात 400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. दोन वर्षांपूर्वी 85 रुपये किमतीवर ट्रेड करणारा स्टॉक 800 टक्के वाढला आहे.

फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर या कंपनीचे शेअर्स फक्त NSE इंडेक्सवर ट्रेड करत आहेत. फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीचे एकूण भांडवल 983 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52-आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 824 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 142 रुपये होती. आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअरची किंमत 4 टक्के पेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत आहे. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर हा स्टॉक सेव्ह करून ठेवा.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Focus Lighting Share Price today on 22 September 2023.

हॅशटॅग्स

Focus Lighting Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x