18 November 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Free Bonus Shares | अनमोल इंडिया कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी तुम्ही सुद्धा फायदा घेऊ शकता, डिटेल्स पाहा

Free Bonus Shares

Free Bonus Shares | अनमोल इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या गुंतवणुकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की अनमोल इंडिया कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर चार बोनस शेअर्स वाटप करणार आहे.

बोनस शेअर वाटप करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 18 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 236.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अनमोल इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक इक्विटी शेअरवर चार मोफत इक्विटी शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या स्टॉकची तरलता वाढवण्यासाठी गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करतात.

अनेक वेळा कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणारे बनावे म्हणून देखील बोनस शेअर्स वाटप करत असतात. बोनस शेअर्स हे पूर्णतः पेड अप शेअर्स असतात. जेव्हा एखादी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करते, त्यावर गुंतवणूकदारांना कोणताही चार्ज भरावा लागत नाही.बोनस शेअर्स वाटपात कंपनीने निश्चित केलेल्या रेकॉर्ड तारखेपूर्वी शेअर्स धारण धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना पात्र समजले जाते.

अनमोल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार यांना 27 मे 2023 पासून पुढे पाच वर्षांची मुदत वाढ देण्यात येऊन त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. अनमोल इंडिया ही कंपनी मुख्यतः कोळसा ट्रेडिंगचा व्यवसाय करते. ही कंपनी परदेशातून कोळसा भारतात आयात करते आणि वितरीत करते. अनमोल इंडिया कंपनीने 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 71.49 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Free Bonus Shares announced by Anmol India company on 11 July 2023.

हॅशटॅग्स

Free Bonus Shares(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x