19 November 2024 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Future Lifestyle Fashions Share Price | बाब्बो! 491 रुपयांचा शेअर घसरुन 5 रुपये 65 पैशावर आला, आता स्टॉक तेजीचं कारण काय?

Future Lifestyle Fashions Share Price

Future Lifestyle Fashions Share Price | ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ या फ्युचर ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीमध्ये व्यवस्थापन स्तरावर मोठे बदल झाले असल्याची बातमी येत आहे. ‘विष्णुप्रसाद एम’ यांनी ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक पदाचा त्याग केला आहे. 1 मार्च 2023 रोजी ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 5.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक 4.68 टक्के वाढीसह अप्पर सर्किट मध्ये ट्रेड करत आहेत. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 99 टक्के घसरण झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Future Lifestyle Fashions Share Price | Future Lifestyle Fashions Stock Price | BSE 536507 | NSE FLFL)

491 रुपयेवरुन स्टॉक 5.37 रुपयांवर आला :
‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत मागील 4 वर्षांत 99 टक्के घसरली आहे. या कालावधीत हा स्टॉक 491 रुपये किमतीवरुन घसरुन 5.65 रुपये किमतीवर आला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1,000 रुपये झाले आहे. मागील चार वर्षांपासून या कंपनीचे शेअर्स जबरदस्त मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मुकेश अंबानीं फ्युचर रिटेल कंपनीचा व्यवसाय विकत घेण्याचा प्रयत्न करत होते, मात्र Amazon ने त्यात अडथळा निर्माण केला. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

कंपनीची कामगिरी :
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘फ्यूचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ कंपनीला 135.96 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, एप्रिल-जून 2022 तिमाहीत ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ कंपनीच्या खर्चात कपात झाल्यामुळे निव्वळ तोटा घटला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 348.08 कोटी रुपयेवर आला होता. तर समीक्षाधीन तिमाही कालावधीत कंपनीचा परिचालन महसूल 8.42 टक्क्यांच्या घसरणीसह 272.88 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 297.99 कोटी रुपये परिचालन उत्पन्न मिळवला आहे. एप्रिल-जून 2022 या तिमाही कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 436.56 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षाच्या 656.07 कोटी रुपयांच्या तुलनेत 33.45 टक्के कमी झाला आहे. ‘फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीने दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीला कर्जदारांसह वन टाईम कर्ज पुनर्रचना योजने अंतर्गत पुढील 12 महिन्यांच्या कालावधीत एकूण 422.11 कोटी रुपयांचे थकीत कर्ज फेडायचे आहे. 31 मार्च 2022 पर्यंत कंपनीवर एकूण 1,180.66 कोटी रुपये कर्ज होते. कंपनीने सप्टेंबर-डिसेंबर 2022 तिमाहींचे निकाल जाहीर केले नाही त्यामुळे नवीन आकडेवारी उपलब्ध नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Future Lifestyle Fashions Share Price 536507 FLFL stock market live on 01 March 2023.

हॅशटॅग्स

Future Lifestyle Fashions Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x