18 November 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Future Retail Share Price | अदानी-अंबानी ग्रुपशी नाव पुन्हा जोडलं जाण्याच्या बातम्या, फ्युचर ग्रुपचा शेअर तेजीत, काय घडतंय?

Future retail share price

Future Retail Share Price | कर्ज बाजारी उद्योजक आणि एके काळी रिटेल किंग म्हणून प्रसिद्ध असलेले किशोर बियाणी यांच्या फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील आठवड्यात कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज पुन्हा एकदा फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीची ट्रेडिंग बंद करण्यात आली होती. वास्तविक ही कंपनी दिवाळखोर झाली असून कंपनीवर कर्जाचा डोंगर आहे. एखाद्या कंपनीच्या शेअर्सची डि-लिस्टिंग काही विशेष प्रकरणात केली जाते. जेव्हा एखादी कंपनी तिचे कार्य बंद करते किंवा दुसऱ्या कंपनीत विलीन होते, विस्तार करते किंवा पुनर्रचना करू इच्छिते तेव्हा अशा विशेष परिस्तिथीतीत कंपनी स्टॉक मार्केट मधून डी-लिस्ट होते. जी कंपनी सेबी द्वारे निश्चित नियमांचे योग्य पालन करत नाही किंवा दिवाळखोरीच्या प्रक्रियेत अडकली असते अशी कंपनी सुद्धा स्टॉकमधून डी-लिस्ट केली जाते.

फ्युचर रिटेल डील :
दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी फ्युचर रिटेल कंपनी करण्याच्या खरेदी करण्याच्या शर्यतीत सामील आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 5 टक्के वाढीसह 3.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अपर सर्किटवर ट्रेड करत आहे. सध्या स्टॉक मार्केटमध्ये एक बातमी आली आहे की, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांनी फ्युचर रिटेल कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि मून रिटेल प्रायव्हेट कंपनी, अदानी ग्रुप, फ्लेमिंगो ग्रुप, यासारख्या मोठ्या 13 कंपन्यांनी दिवाळखोर झालेल्या Future Retail या कंपनीला खरेदी करण्याची तयारी केली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या स्टॉक मार्केट तज्ञांनी सांगितले आहे की, या 13 कंपन्यांनी आता फ्युचर रिटेल कंपनीच्या अॅसेट्समध्ये स्वारस्य व्यक्त केले आहे. या सर्व कंपनीचा प्रयत्न आहे की फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्स या आणखी एका सूचीबद्ध कंपनीमध्येही हिस्सा मिळवावा. त्याचवेळी नागपुरमधील सप्लाय चेन गोदामावर मिळालेल्या बोलीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. फ्यूचर सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये 700 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. ही कंपनी एकूण 8.02 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेले 65 वितरक सेंटर चालवत आहे. या कंपनीचे पूर्ण देशभरात 13 सप्लाय हब आणि 123 शाखा आहेत. ही कंपनी लहान उद्योजकांना फ्रँचायझीही देते.

Future Retail शेअरमध्ये घसरण :
या कंपनीचे शेअर्स आत्तापर्यंत 92 टक्के कमजोर झाले आहेत. फ्यूचर रिटेल कंपनीचे शेअर्स 10 ऑक्टोबर 2022 पासून BSE-NSE वर ट्रेडिंग करत नाही आहे. म्हणजेच हे शेअर डी-लिस्ट झाले आहेत. फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 3.60 रुपये किमतीवर डी-लिस्ट झाले आहेत. या वर्षी आतापर्यंत फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्सची किंमत 95 टक्क्यांनी पडली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Future retail share price return on investment and Adani Ambai are interested to buy Future retail company on 16 November 2022.

हॅशटॅग्स

Future retail share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x